Talegaon Dabhade Crime News : कारचा आरसा लागल्याने टोळक्याची चालकाला जबर मारहाण

Talegaon Dabhade Crime News : कारचा आरसा लागल्याने टोळक्याची चालकाला जबर मारहाण


Pckhabar- दुचाकीवरून जाणार्‍या दोघांना कारचा आरसा लागल्याने सहा जणाच्या टोळक्याने दुचाकी कारला अडवी लावून कार चालकाला शिवीगाळ करत लाथाबुक्यांनी, दगडाने जबर मारहाण केली. ही घटना रविवारी सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास सोमाटणे टोलनाक्याच्या पुढे घडली.

निकेत रमेश ढमढेरे (वय-26, रा. तळेगाव ढमढेरे) असे जखमी झालेल्या कार चालकाचे नाव असून त्यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार धिरज अनिल गरूड (रा. तळेगाव दाभाडे) याच्यासह आणखी पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी धिरज आणि त्याचा मित्र सोमाटणे टोलनाक्याजवळून दुचाकीवरून जात होते. त्यावेळी फिर्यादी यांच्या कारचा आरसा धिरज व त्याचा मित्राला लागला. यामुळे चिडलेल्या आरोपींनी कारला दुचाकी अडवी लावून शिवीगाळ केली. साथीदारांना बोलावून घेत सहा जणांनी निकेत यांना लाथाबुक्यांनी, दगडाने जबर मारहाण करून धमकी देऊन निघून गेले.  तळेगाव दाभाडे पोलीस तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *