Nigdi News : प्राधिकरणात साकारली  प्रतापगड किल्ल्याची भव्य प्रतिकृती; बालचमूंपुढे उलगडतोय शिवरायांचा पराक्रमी इतिहास


Nigdi News : प्राधिकरणात साकारली  प्रतापगड किल्ल्याची भव्य प्रतिकृती; बालचमूंपुढे उलगडतोय शिवरायांचा पराक्रमी इतिहास


Pckhabar-शिवभुमी प्रतिष्ठान आणि पिंपरी चिंचवड महापालिकेच्या विद्यमान नगरसेविका शर्मिलाताई बाबर यांच्या वतीने निगडी प्राधिकरणातील वीर सावरकर उद्यानासमोर दिपावली निमित्त प्रतापगड किल्ल्याची भव्य प्रतिकृती साकारण्यात आली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील सर्वात मोठ्या असलेल्या ‌या किल्ल्याच्या माध्यमातून लहान मुलांसमोर छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रमी इतिहास उलगडला जात आहे.

 या किल्ल्याच्या प्रतिकृतीचे उद्घाटन आज रविवारी दि. ३१ ऑक्टोबर २०२१ रोजी सकाळी नगरसेविका शर्मिलाताई बाबर यांच्या हस्ते झाले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र बाबर,  प्रशांत मोरे, रुपेश मोरे, व्यंकटेश काळे, जयेश मोरे,  प्रसाद जोगळेकर, प्रवीण कोल्हे, राजेश कडू, बशीर नदाफ, सागर सोनावले, मुकुंद काटे, वैभव नाईकरे, संजय छाजेड आदी उपस्थित होते.‌

या उपक्रमाविषयी बोलताना शर्मिलाताई बाबर म्हणाल्या की,”दिपावली हा उत्साह, आनंदाचा सण म्हणून ओळखला जातो. या सणात बालचमू म्हणजेच लहान मुलांचा आवडता विषय म्हणजे गड-किल्ले बनविणे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमी इतिहासाचा साक्षीदार प्रतापगड किल्ला आहे. मुलांसाठी या किल्ल्याची शहरातील सर्वांत मोठी ३० फूट लांब आणि २० फूट रुंद या आकाराची ही प्रतिकृती तयार करण्यात आली आहे. या ठिकाणी मुर्ती, सजावटीच्या माध्यमातून शिवरायांच्या जिवनातील प्रसंग दाखविण्यात आले आहेत.  ७ नोव्हेंबर २०२१ पर्यंत हा किल्ला मुलांना व‌ नागरिकांना पाहण्यासाठी खुला राहणार आहे”.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *