
Dehugaon News: ज्येष्ठ नागरिकांसाठी उद्या विशेष तपासणी शिबीराचे आयोजन

Pckhabar- ‘अनंत दीर्घायुषी योजनेअंतर्गत’ उद्या (सोमवार) सकाळी ९ ते दु. १ या वेळेत प्राथमिक आरोग्य केंद्रात ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती प्राथमिक आरोग्य केंद्राचे मुख्य वैद्यकीय अधिकारी तथा नेत्रतज्ज्ञ डॉ. किशोर यादव यांनी दिली.

यासाठी देहू मल्टिस्पेशालीटी हॉस्पिटल येथे अस्थिरोग तज्ञ डॉ. प्रितम पालकर MBBS, D.ortho (Consultation Orthopeadic Surgeon) व डॉ योगेश्वर भावसार , MBBS, TDD (chest and general physician) हे तज्ञ उपस्थित असणार आहेत. यावेळी ज्येष्ठ नागरिकांना आजाराचे निदान, औषधोपचार व मार्गदर्शन करण्यात येणार आहे. यावेळी जि.प. सदस्या शैला खंडागळे, पंचायत समिती सदस्या हेमलता काळोखे उपस्थित राहणार आहेत.

या शिबिराचा देहूगाव पंचक्रोशीतील जास्तीत-जास्त ज्येष्ठ नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. यादव यांनी केले आहे.











Leave a Reply