

Pimpri Shivsena News : वाढत्या महागाई विरोधात युवा सेनेच्या वतीने सायकल रँली
Pckhabar-वाढती महागाई, सीएनजी गॅस, घरगुती गॅस व पेट्रोल-डिझेलच्या अवास्तव दरवाढीविरोधात केंद्र सरकारला जाब विचारण्यासाठी युवा सेनेच्या वतीने फिनोलेक्स चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकापर्यंत सायकल रॅली काढून केंद्र सरकारच्या विरोधात रोष व्यक्त करण्यात आला.

वाढत्या महागाई विरोधात युवा सेनेच्या वतीने राज्यात सायकल रँली काढण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड युवा सेनेच्या वतीने आज (रविवार) वाढत्या महागाई विरोधात सायकल रँली काढण्यात आली.

याप्रसंगी युवासेना मावळ लोकसभा विस्तारक राजेश पळसकर, युवासेना शहर अधिकारी विश्वजीत बारणे, युवासेना शहर समन्वयक रूपेश कदम, उपशहर अधिकारी राजेंद्र तरस, युवतीसेना अधिकारी प्रतिक्षा घुले, चिंचवड विधानसभा अधिकारी माऊली जगताप, पिंपरी विधानसभा अधिकारी निलेश हाके, व सर्व युवासेना पिंपरी चिंचवड शहर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.











Leave a Reply