Pimpri political News: महापालिकेतील भाजपाची भ्रष्टसत्ता संपवा : काँग्रेसचे शहराध्यक्ष कैलास कदम
काळेवाडी येथील मेळाव्यातून काँग्रेसची प्रचारास सुरूवात


Pckhabar-मनपातील स्थायी समिती चे
सभापती यांना लाचलुचपत विभागाकडून रंगेहात पकडले गेले पोलिस त्यांना अटक करून घेऊन गेले हे मनपा ईतिहासात प्रथमच घडले व त्यांना पुन्हा त्याच पदावर ठेवत भाजपाने भ्रष्टाचारास आपला स्पष्ट पाठिंबा दिल्याचे शहरातील नागरिकांनी पाहीले आहे या व अशाच अनेक प्रकरणांना जबाबदार असणारे भाजपाचे भ्रष्टसत्ता संपवा, असे आवाहन काँग्रेसचे शहराध्यक्ष कैलास कदम यांनी केले.
पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस कडून नुकतीच भारतमाता चौक काळेवाडी येथे प्रचार सभा आयोजित करण्यात आली. या सभेस नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला. आगामी महानगरपालिका निवडणूकीच्या दृष्टीने शहरात काँग्रेस कार्यकर्त्यांचे संघटन वाढविण्याच्या काम काँग्रेस पक्षाकडून सुरू केले आहे त्या अनुषंगाने विविध भागांत सभा व कार्यकर्त्यांच्या बैठाका आयोजित करण्यात येत आहेत.
काँग्रेस पक्षात नुकतेच प्रवेश केलेले काळेवाडी भागातील काँग्रेस कार्यकर्ते रवी नांगरे व सहका-यांनी सभेचे आयोजन केले. या सभेस अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव व आसाम राज्याचे प्रभारी पृथ्वीराज साठे हे प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित होते सभेच्या अध्यक्षस्थानी काँग्रेसचे शहराध्यक्ष कैलास कदम होते.

या प्रसंगी बोलताना अखिल भारतीय
काँग्रेस कमिटीचे सचिव व आसाम राज्याचे प्रभारी पृथ्वीराज साठे म्हणाले, “मोदी हे बहूरूपी नेते आहेत ते केवळ प्रादेशिक निवडणूकांनूसार वेशभूषेत बदल करतात, त्यांच्या सरकारने जनतेची घोर फसवणुक केली आहे व जनता आज देशभर पश्चाताप व्यक्त करत आहे बेरोजगारी, महागाई, भ्रष्टाचार, अन्याय,अत्याचार, इंधन दरवाढ, देशाची वाढती असुरक्षितता, खाजगीकरण तसेच अनेक समस्या या वाढतच चालल्या आहेत व मोदी जी केवळ दिलेल्या लसीकरणाचे भांडवल करत जणू देशावर उपकारक केल्याप्रमाणे वागत आहेत त्याच विचाराच्या सरकारने महानगरपालिकेच्या तिजोरी वर डल्ला मारण्याचे काम निरंतर सुरूच ठेवले आहे. वाकड येथील स्मार्ट सिटीच्या भ्रष्टाचाराविरोधात त्यांच्याच पक्षाच्या नगरसेवकांने भाजपाला घरचा आहेर देऊन सर्व स्पष्ट केले आहे.

कोविड काळात जंम्बो कोविड केंद्रानीं नागरिकांवर जीवघेणी वेळ आणली असा अनियोजित कारभार केला व त्यात ही मनपातील सत्ता धारी भाजपाने पैसे कमावले हे दुर्दैव आहे आता ह्यांचे सरकार कायमस्वरुपी घालवणे अतिशय गरजेचे आहे”
काँग्रेस चे शहराध्यक्ष कैलास कदम म्हणाले, “ भाजपाने केंद्रातून अन्यायकारक कामगार व कृषी कायदे
तयार केले खाजगीकरण करून ते सर्व महत्वाच्या भारतीय संस्था विकत आहेत, गरीबांवर आज अन्न,वस्त्र,निवारा,आरोग्य व शिक्षण हे प्रश्न वाढतच चालले आहेत याला सुध्दा भाजपाच जबाबदार आहे, गॅस दरवाढीने माझ्या माता भगिणी वैतागून पुन्हा इतर इंधन प्रकाराकडे वळत आहेत पेट्रोल डिझेल सीएनजी च्या दरवाढीचा विक्रम होत आहे, देशात समस्यांचा हाहाःकार व महानगरपालिकेत भाजपाकडून पराकोटीची लूट होत आहे, हे थांबावा आगामी निवडणूकीतून काँग्रेस ला पाच वर्षे द्या व या शहराचा कायापालट करण्याची संधी द्या, काँग्रेस कार्यकर्त्यांची सर्व जबाबदारी माझी आहे कोणी कशाचिही चिंता न बाळगता काम करावे मी पाठिशी कायम ऊभा आहे व सदैव राहीन” असे कदम म्हणाले.

या प्रसंगी अखिल भारतीय काँग्रेस चे सचिव पृथ्वीराज साठे, काँग्रेसचे शहराध्यक्ष डॅा.कैलास कदम, माजी महापौर कविचंद भाट, महिला नेत्या श्यामला ताई सोनवणे, पर्यावरण विभागाचे माजी प्रातांध्यक्ष अशोक मोरे, शिक्षण मंडळाचे माजी उपसभापती शाम अगरवाल, माऊली मलशेट्टी, अल्पसंख्यांकांच्या विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र सिंग वालिया, युवक काँग्रेस चे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे, सेवादलाचे शहराध्यक्ष विरेंद्र गायकवाड, ख्रिश्चन एकता मंचाचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रकाश पाठारे, रवि नांगरे, विजय ओव्हाळ, माजी नगरसेवक विश्वास गजरमल, एन एस यु आय चे प्रदेश उपाध्यक्ष ॲड उमेश खंदारे, सोपानराव माने, नंदाताई तुळसे, छायाताई देसले, पुजाताई बिबवे, शहाबुद्दाीन शेख, सज्जी वर्की, किरण नढे, हिराचंद जाधव, मिलिंद बनसोडे, बाबा गायसमुद्रे,शहर काँग्रेस चे सांस्कृतिक विभागाचे शहराध्यक्ष गणेश नांगरे, प्रकाश नांगरे, अजय काटे, आनंद भाटे
पंकज पाटोळे , अशोक गायकवाड
नरेंद्र नांगरे, प्रथम नांगरे, प्रकाश पठारे, गणेश नांगरे, प्रतीक साळवी,फ्रान्सिस गजभिव, निर्मळ साबळे फादर सालोमन भंडारी, आशाताई नांगरे, सामाजिक कार्यकर्त्या गीताताई यादव,सामाजिक कार्यकर्ता राधाताई काटे, सामाजिक कार्यकर्त्या हिरा ताई साळवे,
युनुस आतार, महेंद्र सोनवले आदि उपस्थित होते.










Leave a Reply