

Dehugaon News : अभंग इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी जपली ‘सामाजिक बांधिलकी’
“माई बालभवन”या दिव्यांग व अनाथ मुलांच्या सेवाभावी संस्थेस शालेय साहित्याची मदत
Pckhabar- अभंग इंग्लिश मिडीयम स्कूलच्या वतीने दिवाळीनिमित्त विद्यार्थ्यांच्या मनामध्ये सामाजिक जाणिवा व संवेदना, जागृतीसाठी विद्यार्थी व पालकांना एखाद्या सेवाकार्य करणाऱ्या सेवाभावी संस्थेसाठी मदतीचे आवाहन केले जाते. यावर्षी संस्थेने केलेल्या आवाहनाला विद्यार्थी आणि पालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. विद्यार्थ्यांनी जमा केलेले शालेय उपयोगी साहित्य शिरगाव येतील “माई बालभवन”या दिव्यांग व अनाथ मुलांच्या सेवाभावी संस्थेस भेट देण्यात आले.

अभंग इंग्लिश मिडीयम स्कूल, देहू यांच्या माध्यमातून दरवर्षी प्रमाणे दिवाळी निमित्त विद्यार्थ्यांच्या मनामध्ये सामाजिक जाणिवा व संवेदना जागृतीसाठी विद्यार्थी व पालकांना एखाद्या सेवाकार्य करणाऱ्या सेवाभावी संस्थेसाठी मदतीचे आवाहन केले जाते.

यावर्षी समाजातील गरजू मुलांच्या शालेय शिक्षनासाठी शालेय साहित्य देण्याचे आवाहन शाळेच्या वतीने करण्यात आले होते. विद्यार्थ्यानी आपल्या पालकांशी या विषयी संवाद साधून गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य शाळेमध्ये जमा केले. इतरांच्या जीवनात आनंद निर्माण करण्यासाठी आपण आपल्या परीने सहकार्य केले पाहिजे. हा समाजसेवेचा संस्कार विद्यार्थी मनावर रुजविण्याचा उद्देश निश्चित पणे यातून साध्य होतो…एक आदर्श संवेदनशील नागरिक यातून घडत असतो अशी भावना विद्यालयाच्या प्राचार्य डॉ.कविता अय्यर यांनी व्यक्त करीत या उपक्रमास सहकार्य करणाऱ्या सर्व पालक बंधु-भगिनीचे आभार व्यक्त केले.

विद्यार्थ्यानी जमा केलेले हे सर्व साहित्य व अभंग इंग्लिश मिडीयम स्कूलच्या वतीने शालेय उपयोगी साहित्य एकत्रित करून शिरगाव येतील “माई बालभवन”या दिव्यांग व अनाथ मुलांच्या सेवाभावी संस्थेस भेट देण्यात आले. याप्रसंगी संस्थेचे संचालक प्रशांत काळोखे, सौरभ कंद, शिवराज हगवणे, आशिष काळोखे उपस्थित होते.










Leave a Reply