

T 20 World Cup News: भारतीय संघासाठी आज ‘करो या मरो’ स्थिती
भारताचा न्यूझीलंड विरुद्ध रंगणार सामना
Pckhabar-टी-20 विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानकडून भारताचा मानहानिकारक पराभव झाल्यानंतर आता न्यूझीलंड विरुद्ध सामना होणार आहे. पाकिस्तानने दोन्ही संघाचा पराभव केल्यामुळे उपांत्य फेरीमध्ये जाण्यासाठी दोन्ही संघ प्रयत्न करणार आहेत. आज सायंकाळी दुबईत हा सामना होणार आहे.

स्पर्धेत दोन्ही संघांना पहिल्याच सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले आहे. भारताला पाकिस्तानकडून 10 गडी राखून पराभव स्वीकारावा लागला, तर न्यूझीलंडलाही पाकिस्तानने पराभूत केले आहे. उपांत्य फेरीच्या आशा कायम ठेवण्यासाठी भारताला न्यूझीलंडला कोणत्याही परिस्थितीत पराभूत करावे लागणार आहे.

भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याला दुखापत झाल्यामुळे त्याच्या जागी मुंबई इंडियन्सचा फलंदाज ईशान किशनला संधी मिळण्याची शक्यता आहे. सराव सामन्यात किशनने धमाकेदार खेळी केली होती. हार्दिक संघात खेळणार की नाही, याबाबत अद्याप माहिती समोर आली नाही. त्यामुळे आगामी सामन्यात हे दोन बदल करण्याच्या तयारीत संघ आहे.

भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांना आपले उर्वरित चारही सामने जिंकणे आवश्यक आहे. जो संघ चार सामने जिंकेल त्याला 8 गुण मिळतील आणि निव्वळ धावगती खूप कमी असली तरी त्याचा उपांत्य फेरी गाठण्यावर कोणताही परिणाम होणार नाही. अशा परिस्थितीत उपांत्य फेरीच्या मार्गात दोन्ही संघ एकमेकांसाठी सर्वात मोठा अडथळा आहेत.










Leave a Reply