

Pckhabar-दिघी गावचे कार्यक्षम नगरसेवक विकास डोळस यांची दुसर्यांदा ई प्रभाग अध्यक्षपदी निवड झाल्याने दिघी विकास मंचाच्या वतीने ई प्रभाग सभागृहामध्ये त्यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी दिघी विकास मंचचे मुख्य सल्लागार सुनिल काकडे , मार्गदर्शक के.के.जगताप, पांडुरंग म्हेत्रे, खजिनदार दत्ता घुले, रज्जाक पठाण, कुंडलिक आदक, दिव्या शिक्षण संस्थेचे संचालक इंद्रजीत भोसले, कुंडलिक आदक, सतीश खरात,मराठवाडा विकास संस्थेचे अध्यक्ष प्रकाश इंगौले, धनाजी कोंडजे, संदीप पंडीत, जयराम लिमशे, रमेश विरनक, बाळासाहेब सुपे, सलीम शेख, कुमार लोमटे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी अनेक वक्त्यांनी नगरसेवक विकास डोळस यांच्या प्रभागातील कार्याचे खुप खुप कौतुक केले. तसेच पुढील भावी वाटचालीस शुभेच्छाही दिल्या.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन पांडुरंग म्हेत्रे यांनी केले. हॅप्पी इंग्लिश स्कुलचे जगताप सर यांनी आभार मानले.










Leave a Reply