Chinchwad political News : भाजपच्या चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या प्रभारीपदी संतोष कलाटे

Chinchwad political News : भाजपच्या चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या प्रभारीपदी संतोष कलाटे


Pckhabar- भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र  प्रदेश कार्यकारणीच्या निमंत्रित सदस्य पदी  व चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या प्रभारीपदी उद्योजक संतोष कलाटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

कलाटे यांना भाजपचे प्रदेशाध्यक्ष
आमदार चंद्रकांत पाटील यांनी नियुक्ती पत्र दिले. यावेळी  आमदार लक्ष्मण जगताप, पिंपरी-चिंचवड मनपाच्या स्थायी समितीचे माजी अध्यक्ष विलास मडीगेरी उपस्थित होते.

पक्ष कार्य वाढविण्याकरिता  व त्यांच्या समाजकारण व पक्षाकरिता केलेल्या कार्याचा प्रदीर्घ अनुभव लक्षात घेता कलाटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *