Bhosari Crime News : कारच्या धडकेत दुचाकीवरील सहा वर्षीय मुलगी ठार; तिघे गंभीर जखमी

Bhosari Crime News : कारच्या धडकेत दुचाकीवरील सहा वर्षीय मुलगी ठार; तिघे गंभीर जखमी


Pckhabar- भरधाव वेगातील कारने धडक दिल्याने दुचाकीवरील  सहा वर्षीय मुलीचा मृत्यू झाला तर तिघे गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना फुगेवाडीतील केंद्रीय विद्यालयाजवळ शुक्रवारी सायंकाळी पाचच्या सुमारास घडली.
संजु मनोज यादव (वय 40) मनोज ननकु यादव (वय 40) आणि सुरेंद्रकुमार पुर्णनंदा सारंगी (वय 45, पुणे) असे अपघातात जखमी झालेल्यांची नावे आहेत. शशी शंकर राजु (वय 45) असे गुन्हा दाखल झालेल्या कार चालकाचे नाव आहे. याप्रकरणी राजेश हिरालाल यादव (वय 34, रा. काळेवाडी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शशी  (एम एच 04/ जी झेड 3982) या क्रमांकाची कार भरधाव वेगाने चालवत होता. कारने फिर्यादी यांच्या बहीणीच्या ज्युपिटर (एम एच 14, एन एफ 1599) हिला जोरदार धडक दिली. यामध्ये फिर्यादी यांच्या बहिण व इतर दोघे जण गंभीर जखमी झाले. फिर्यादी यांच्या बहिणीची सहा वर्षीय मुलगीचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला. भोसरी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *