

Pckhabar- डोंगरावर असलेल्या स्वयंभू मोरया गणपती मंदिर आणि दर्या आई मंदिराच्या गाभार्याच्या दरवाज्याचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने दान पेटीतील 30 हजार रूपयांची रोकड चोरून नेली. ही धक्कादायक घटना मावळातील कदमवाडी येथे शुक्रवारी सकाळी उघडकीस आली.
याप्रकरणी मंदिराचे पुजारी धोंडिबा संतू कदम (वय-60, रा. कदमवाडी, आंबळे, ता. मावळ) यांनी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कदमवाडीच्या डोंगरावर स्वयंभू मोरया गणपती मंदिर आणि दर्या आईचे मंदिर आहे. गुरूवारी पुजारी कदम यांनी नेहमीप्रमाणे सायंकाळी मंदिराचा गाभारा कुलूप लावून बंद केला. चोरट्याने गुरूवारी रात्री गाभार्याच्या दरवाज्याचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. दान पेटीचा कडी-कोयंडा तोडून 30 हजार रूपयांची रोकड चोरून नेली. शुक्रवारी सकाळी सहा वाजता पुजेसाठी कदम आल्यानंतर हा चोरीचा प्रकार उघडकीस आला. पोलीस उपनिरीक्षक आहिरे तपास करत आहेत.










Leave a Reply