Chinchwad News : प्रतिभा कनिष्ठ महाविद्यालयात ‘वॉईस ऑफ प्रतिभा’  2021 स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद 

Chinchwad News : प्रतिभा कनिष्ठ महाविद्यालयात ‘वॉईस ऑफ प्रतिभा’  2021 स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

Pckhabar- चिंचवड मधील  प्रतिभा कनिष्ठ महाविद्यालयात दि.२८ आक्टोबर  २०२२१ रोजी ” व्हॉइस ऑफ प्रतिभा -२०२१ ”  स्पर्धा घेण्यात आली. या  स्पर्धेकरिता कनिष्ठ व वरिष्ठ गटातुन उत्तुंग प्रतिसाद मिळाला.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व तज्ञ म्हणून नंदिन सरीन,  वंदना राम लल्लू हे होते. या तज्ञांनी गायन  विषयावर  विद्याथ्या॔ना  सखोल मार्गदर्शन केले. स्पर्धेमधील सहभागी व पारितोषिक विजेत्या विद्यार्थ्यांचे तोंडभरून कौतुक  ही केले.

स्पर्धेमधील विजेते विद्यार्थी खालील प्रमाणे –

कनिष्ठ गट –

१) निशाद आपटे – प्रथम क्रमांक

२) आदित्य गांधी – द्वितीय क्रमांक

३) यश जगताप –   तृतीय क्रमांक

वरिष्ठ गट –

१) सुमेध मुतालीक – प्रथम क्रमांक

२) अवस्थी एस. – द्वितीय क्रमांक

३) मानसी वाडकर – तृतीय क्रमांक

          या स्पर्धेकरिता संस्थेचे सचिव डॉ.दीपकजी शहा ,संस्थेचे सी.ए.ओ. डॉ.राजेंद्र कांकरिया, प्रतिभा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बाबासाहेब सांगळे, उप प्राचार्या डॉ. क्षितिजा गांधी, डॉ. जयश्री मुळे, डॉ. सचिन बोरगावे, डॉ. पोर्णिमा कदम,कनिष्ठ महाविद्यालयाच्या उप-प्राचार्या डॉ.वनिता कुऱ्हाडे उपस्थित होते. तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर वृंद आणि पालक या सर्वानी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढविली.

  या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. वृषाली वाघमारे, प्रा. प्रतिभा बिराजदार यांनी केले. पाहुण्यांचा परिचय प्रा. शबाना शेख यांनी करून दिला व  संस्कृतिक विभागाच्या प्रमुख प्रा.अर्चना गांगड यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *