Sangvi News : फटाके मुक्त दिवाळी साजरी करण्यासाठी जनजागृती


Sangvi News : फटाके मुक्त दिवाळी साजरी करण्यासाठी जनजागृती
Pckhabar-मानवी हक्क संरक्षण आणि जाग्रतीच्या वतीने पटनाटयाद्धारे, भितीपत्रके वाटुन , स्पीकरद्धारे आव्हान करुन, फटाके न वाजवण्याची शपथ देऊन, फटाके मुक्त दिवाळी साजरी करण्यासाठी पिंपळे गुरव आणि परिसरात जनजागृती करण्यात आली.

पिंपळे गुरव येथील राजमाता जिजाऊ उद्यानात व काटे पुरब चौकात मानवी हक्क संरक्षण आणि जाग्रतीच्या वतीने पटनाटयाद्धारे, स्पिकरद्धारे,भितीपत्रके वाटून फटाके न वाजवण्याची शपथ देऊन,फटाके मुक्त, दिवाळी साजरी करण्याचे आव्हान व चायनीज वस्तू खरेदी करु नये म्हणून जनजागृती करण्यात आली. आपण शासनाने ज्या मोठ्या फटाक्यांना बंदी घातलेले असे फटाके वाजु नयेत. पर्यावरण पुरक दिवाळी साजरी करावी. फटाक्यांच्यामुळे पक्षाचा मृत्यू होतो. फटाक्यांमध्ये तांबे व कँडमियमसारखे विषारी घटक आसतात. धुळीकण रुपात हवेत बराच काळ राहतात.पर्यावरणात नायट्रोजनड्राय, कार्बनडाय ऑक्सिइड सुल्फड्राय ऑक्सिइड,हे धुराच्या रुपाने बाहेर पडत आसतात, त्यामुळे फुफ्फुसाच्या विकारात वाढ होते ,जेष्ट नागरीक,लहान मुले, आजारी व्यक्ती, ह्मदय विकाराचे व्यक्ती, आस्थामा,गर्भवती स्त्रिया, यांच्या जिवीतास धोका निर्माण होतो, आणि पर्यावरणाचा ऱ्हास ही ह़ोतो हे टाळण्यासाठी आपण सर्वांनी फटाके मुक्त दिवाळी साजरी करु या,असे आण्णा जोगदंड स्पिकरद्धारेही आव्हान करत होते.

यावेळी उपस्थित नागरिकांना जेष्ट नागरिक प्रकाश बंडेवार यांनी फटाके मुक्तीची शपथ व चायनीज वस्तू न खरेदी करण्याची शपथ दिली.

भारतीय अर्थव्यवस्था खिळखिळी करणाऱ्या पाकधार्जीन्या चीनच्या वस्तूवर बहिष्कार टाकावा आपण स्वाभिमानी होउन स्वदेशी वस्तूच खरेदी कराव्यात.पर्यावरण पुरक आकाशकंदील घ्यावेत असे आव्हान मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष अरुण पवार यांनी केले.

यावेळी भैरवनाथ जेष्ट नागरिक. संघाचे अध्यक्ष मल्हारराव येळवे यांनी सांगितले की कोरोनाच्या काळात जिवावर उधार होऊन काम करणाऱ्या पोलीस कर्मचारी, डाँक्टर, नर्स,आरोग्य कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते यांनी जे कोरोना योद्धे म्हणून काम केले त्यांना सन्मानाची वागणूक द्या.कोरोना संपलेला नाही तेव्हा सर्वानी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आव्हान ही  त्यांनी केले.

यावेळी शहराध्यक्ष आण्णा जोगदंड, मुळशी विभाग प्रमुख मीना करंजावणे, पश्चिम महाराष्ट्र महीला अध्यक्षा संगिता जोगदंड,मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष अरूण पवार, भैरवनाथ जेष्ट नागरिक संघाचे अध्यक्ष मल्हारराव येळवे, कार्याध्यक्ष जालंदर दाते, श्रीनिवास पानसरे, संचालिका इंदुमती पवार, लता. गायकवाड, वसंत चकटे,सा.का.प्रदिप गायकवाड, युवक उपाध्यक्ष अक्षय जगदाळे , अमोल लोंढे, बदाम कांबळे, गुजर ए.पी ईत्यादीनी सहभाग नोंदवला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *