Pimpri News : सेवानिवृत्त  कर्मचाऱ्यांनी छंद जोपासून जीवन जगावे : महापौर माई ढोरे

Pimpri News : सेवानिवृत्त  कर्मचाऱ्यांनी छंद जोपासून जीवन जगावे : महापौर माई ढोरे


Pckhabar-  सेवानिवृत्त होत असलेल्या कर्मचा-यांनी आपले सेवानिवृत्ती नंतरचे जीवन आवडते छंद जोपासून आनंदाने जगावे असे प्रतिपादन महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी व्यक्त केले.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने माहे ऑक्टोबर २०२१ अखेर सेवानिवृत्त व स्वेच्छानिवृत्त होणा-या कर्मचा-यांचा सत्कार समारंभ आज संपन्न झाला त्यावेळी महापौर माई ढोरे बोलत होत्या.

सेवानिवृत्ती कार्यक्रमास उपमहापौर नानी उर्फ हिराबाई घुले, प्रभाग अध्यक्ष सुरेश भोईर, सागर आंगोळकर, कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप, जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक, कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष अंबर चिंचवडे, गणेश भोसले, तुकाराम गायकवाड तसेच सेवानिवृत्त कर्मचा-यांचे नातेवाईक उपस्थित होते.

नियम वयोमानानुसार सेवानिवृत्त होणा-या अधिकारी, कर्मचा-यांमध्ये असिस्टंट मेट्रन साधना बोर्डे, सहाय्यक आरोग्याधिकारी अजय जाधव, मुख्य लिपिक प्रकाश वायदंडे, गौतम बाराथे, नंदकुमार तांबे, कनिष्ठ अभियंता महेश बेंडे, वीजतंत्री किशोर कांबळे, इलेक्ट्रीक मोटार पंप ऑपरेटर दिपक गायकवाड, निदेशक अंकुश ढवळे, सफाई कामगार वंदना थोरवे, कांचन जावळे, रखवालदार संभाजी घाडगे यांचा समावेश आहे.

स्वेच्छानिवृत्ती होणा-या कर्मचा-यांमध्ये स्प्रे कुली शैलेंद्र जगताप, सफाई कामगार दिलीप डोळस, आशा गायकवाड, मुक्ताबाई सुर्यवंशी, रत्नमाला गायकवाड, विमल नेटके यांचा समावेश आहे.

          महापौर माई ढोरे म्हणाल्या, सेवानिवृत्त कर्मचा-यांनी अनेक वर्षे महापालिकेची सेवा अतिशय उत्तमरित्या पार पाडली आहे,  त्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त करुन कर्मचा-यांनी आपले आरोग्य जपावे असे सांगितले.

        कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक यांनी केले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *