Pimpri News : वीज कनेक्शन तोडल्याने महावितरण कर्मचार्‍याला टोळक्याची मारहाण

Pimpri News : वीज कनेक्शन तोडल्याने महावितरण कर्मचार्‍याला टोळक्याची मारहाण


Pckhabar- वीज कनेक्शन तोडल्यामुळे महावितरण कर्मचार्‍याला सहा जणांच्या टोळक्याने शिवीगाळ करून धमकी देत लाथाबुक्यांनी, चापटांनी जबर मारहाण केली. तसेच कर्मचार्‍याला जबरदस्तीने मोटारीत घालून घेऊन गेले. ही घटना गुरूवारी दुपारी पावणेतीन वाजता चिंचवड, थरमॅक्स चौक येथे घडली. याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे.
रूपेश गोविंदन नामबियार (वय-35, रा. आकुर्डी), रियाज जिलानी मोहोळकर (वय-32, रा. बिजलीनगर), रिजवान अशफाक शेख (वय-32, रा. काळभोरनगर, चिंचवड), फैज निजाम सय्यद (वय-32, रा. भोईर कॉलनी, चिंचवड), मोहसीन मकसुद भालदार (वय-30, रा. सुदर्शननगर, चिंचवड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. तर अरबाज हारून शेख (वय-29, रा. आकुर्डी) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहूल खंडेराव जाधव (वय-30, रा. मोहननगर, चिंचवड) यांनी निगडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी जाधव हे महावितरणमध्ये कार्यरत आहेत. त्यांनी गुरूवारी आरोपी रूपेश नामबियार याचे वीज कनेक्शन   तोडले होते. याचा आरोपीला राग आल्याने त्याने आपल्या साथीदारांसह चिंचवड  येथील थरमॅक्स चौकातील महावितरणच्या कार्यालयात येऊन सरकारी कामात अडथळा निर्माण केला. जाधव यांना शिवीगाळ करून धमकी देत लाथाबुक्यांनी, चापटांनी जबर मारहाण केली. कार्यालयामधील प्रिंटर फोडून नुकसान केले. तसेच जाधव यांना जबरदस्तीने मोटारीत घालून घेऊन गेले. पोलिसांनी त्वरीत पाच आरोपींना अटक केली असून एक जण पसार झाला आहे. निगडी पोलीस तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *