Nigdi News :  निगडी ते लोणावळा पीएमपीएमएल बस सेवा सुरू


Nigdi News :  निगडी ते लोणावळा पीएमपीएमएल बस सेवा सुरू
Pckhabar- कामशेतपर्यंत असणारी पीएमपीएमएलची सेवा लोणावळ्यापर्यंत सुरू करण्याची प्रवाशांकडून वारंवार मागणी होत होती. याची दखल घेऊन पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या वतीने आज(शुक्रवार) पासून निगडी ते लोणावळा या मार्गावर बस सेवा सुरु करण्यात आली आहे. निगडी ते लोणावळा या मार्गावरील पहिल्या बसला महापौर माई ढोरे, उपमहापौर हिराबाई  घुले यांनी हिरवा झेंडा दाखविला.

निगडी ते लोणावळा या नवीन बसमार्गाचे उद्घाटन महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी उपमहापौर नानी उर्फ हिराबाई घुले, मनसे गटनेते सचिन चिखले, क्रीडा, कला साहित्य व सांस्कृतिक समिती सभापती उत्तम केंदळे,  नगरसेविका सुमन पवळे, नगरसेविका पुणे ज्योस्ना एकबोटे, चिएफ ट्रान्सपोर्ट मॅनेजर (ऑपरेशन) पीएमपीएमएल दत्तात्रय झेंडे,  संत तुकारामनगर डेपोचे आगार व्यवस्थापक संतोष माने आदि उपस्थित होते.

उद्योग, नोकरीनिमित्त लोणावळा, वडगाव, तळेगाव दाभाडे शहरातून पिंपरी-चिंचवड शहरात येणार्‍या नागरिकांची संख्या मोठी आहे. पुणे ते लोणावळा या मार्गावर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकलच्या फेर्‍या कमी होत असल्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत.  कामशेतपर्यंत असणारी पीएमपीएमएलची सेवा लोणावळ्यापर्यंत सुरू करण्याची प्रवाशांकडून वारंवार मागणी होत होती. याची दखल घेऊन पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या निगडी ते लोणावळा पीएमपीएमएलची सेवा सुरू करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *