Nigdi News : किल्ले बनवा स्पर्धा, शिवनेरी सहल व पणती वाटप

Nigdi News : किल्ले बनवा स्पर्धा, शिवनेरी सहल व पणती वाटप

Pckhabar- दिवाळी म्हणजे प्रकाशाचा उत्सव व लहानग्यांची किल्ले बनवण्याची लगबग. हाच योग साधून अमोल तुकाराम भालेकर यांच्यातर्फे रुपीनगर तळवडे प्रभागात ‘किल्ले बनवा’ स्पर्धा आयोजीत करण्यात आली आहे.

लहान मुलांमध्ये आपल्या पराक्रमी इतिहासाचे बाळकडु रुजावे आणि त्यांच्यामध्ये दुर्गसंवर्धनाबद्दल जागृती व्हावी, हा या उपक्रमामागचा उद्देश आहे. स्पर्धेत सहभागी होणार्या प्रत्येक बालमावळ्यास शिवजन्मभुमी शिवनेरी किल्ल्याची सफर घडविणार आहोत. तसेच ‘किल्ला कसा पहावा’याबद्दल मार्गदर्शन करण्यात येईल. विजयी स्पर्धकास आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहे.

दिवाळीच्या पार्श्वभुमीवर संपुर्ण परिसर दिव्यांनी उजळुन जावा यासाठी अमोल भालेकर यांच्यातर्फे घरोघरी पणती वाटप करण्यात आले आहे. प्रभागातील सर्व नागरिकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *