
ST News: एसटी कर्मचार्यांचे आंदोलन; प्रवाशांचे हाल
Pckhabar-थकीत महागाई भत्ता मिळावा, वाढीव घरभाडे मिळावे, सणासाठी 12500 रूपये उचल मिळावी, दिवाळी बोनस 15 हजार मिळावा, सर्व कामगारांना ग्रेड पे ची रक्कम मिळावी, न्यायालयाने दिलेल्या आदेशाप्रमाणे ठरलेल्या तारखेला वेतन मिळावे यासह विविध मागण्यासाठी वल्लभनगर आगारातील एसटी कामगारांनी गुरूवारपासून बेमुदत उपोषणाला सुरूवात केली. त्यामुळे ऐन दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांचे हाल झाले आहेत. याचा गैरफायदा घेत खासगी वाहन चाकलकांनी प्रवाशांकडून जास्त पैसे उकळण्यात येत आहेत. त्यामुळे महामंडळाने एसटी कर्मचार्यांच्या प्रश्नाव लवकरात-लवकर तोडगा काढावा, अशी मागणी प्रवाशी वर्गाकडून करण्यात येत आहे.
एसटी कामगार संघटनेच्या संयुक्त कृती समितीने पुकारलेल्या उपोषणात वल्लभनगर आगारातील सुमारे 150 वाहक, चालक, क्लार्क आदी कर्मचारी सहभागी झाले आहेत.
याबाबत वल्लभनगर आगार कामगार संघटनेचे अध्यक्ष सिध्दार्थ कोरे म्हणाले की, एसटी महामंडळाने कर्मचार्यांचा सहानभूतीने विचार करावा. कर्मचार्यांना थकीत महागाई भत्ता मिळावा, वाढीव घरभाडे मिळावे, सणासाठी 12500 रूपये उचल मिळावी, दिवाळी बोनस 15 हजार मिळावा, सर्व कामगारांना ग्रेड पे ची रक्कम मिळावी, न्यायालयाने दिलेल्या आदेशाप्रमाणे ठरलेल्या तारखेला वेतन मिळावे, कामगार कराराप्रमाणे सर्व कामगारांना नियमित वेतन द्यावे, ठरल्याप्रमाणे वार्षिक वेतन वाढीचा दर 2 ऐवजी 3 टक्याने वाढवून मिळावा, अशा आमच्या विविध मागण्या आहेत.
दरम्यान, अनेक प्रवाशी दिवाळी सणासाठी गावाकडे जाण्यासाठी वल्लभनगर आगारात आले होते. मात्र, कर्मचार्यांचे उपोषण असल्याने त्यांचा हिरमोड झाला. तर काही प्रवाशी एसटी बस कधी सुरू होणार आहेत, याची विचारणा करत होते. आज (गुरूवार) वल्लभननगर आगारातून एकही एसटीची फेरी झाली नाही.










Leave a Reply