
Nigdi News : उद्यापासून निगडी ते लोणावळा पीएमपीएमएल बस सेवा सुरू होणार
Pckhabar- कामशेतपर्यंत असणारी पीएमपीएमएलची सेवा लोणावळ्यापर्यंत सुरू करण्याची प्रवाशांकडून वारंवार मागणी होत होती. याची दखल घेऊन पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या वतीने उद्या (शुक्रवार) पासून निगडी ते लोणावळा या मार्गावर बस सेवा सुरु करण्यात येणार आहे.
निगडी ते लोणावळा या मार्गाचे महापौर माई ढोरे, आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते निगडीतील भक्ती शक्ती चौकात सकाळी 10 वाजता उद्घाटन होणार आहे.
यावेळी पीएमपीएमएलचे व्यवस्थाकीय अध्यक्ष लक्ष्मीनारायण मिश्रा, उपमहापौर नानी घुले, स्थायी समितीचे अध्यक्ष नितीन लांडगे, निगडी डेपो मॅनेजर शांताराम वाघेरे यांच्यासह स्थानिक नगरसेवक उपस्थित राहणार आहेत.
उद्योग, नोकरीनिमित्त लोणावळा, वडगाव, तळेगाव दाभाडे शहरातून पिंपरी-चिंचवड शहरात येणार्या नागरिकांची संख्या मोठी आहे. पुणे ते लोणावळा या मार्गावर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकलच्या फेर्या कमी होत असल्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत. कामशेतपर्यंत असणारी पीएमपीएमएलची सेवा लोणावळ्यापर्यंत सुरू करण्याची प्रवाशांकडून वारंवार मागणी होत होती. याची दखल घेऊन पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या निगडी ते लोणावळा पीएमपीएमएलची सेवा सुरू करण्यात येणार आहे.










Leave a Reply