Dehugaon Crime News : देहूगावात दिवसाढवळ्या एक लाखांची घरफोडी

Pckhabar- बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरटयांनी घरात प्रवेश करून कपाटातील 1 लाखांचे सोन्याचे दागिने चोरून नेले. ही घटना मंगळवारी सकाळी नऊ ते सायंकाळी सात या वेळेत भैरवनाथ चौकाजवळील पार्क इस्टेट येथे घडली.
काशिनाथ विनायक चौधरी (वय-30, रा. पार्क इस्सेट, भैरवनाथ चौक, देहूगाव) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी चौधरी यांचे मंगळवारी सकाळी नऊ ते सायंकाळी सात या दरम्यान घर कुलूप लावून बंद होते. या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. शयनगृहातील कपाटातील लॉकरमध्ये ठेवलेले 1 लाख 3 हजार 741 रूपये किंमतीचे 161 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने चोरून नेले. देहूरोड पोलीस तपास करत आहेत.










Leave a Reply