Bhosari News : दिवाळी शॉपिंग फेस्टिवलचे आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते आज उद्‌घाटन

Bhosari News : दिवाळी शॉपिंग फेस्टिवलचे आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते आज उद्‌घाटन
Pckhabar- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष नितीन लांडगे यांच्या पुढाकाराने आयेाजित केलेल्या दिवाळी शॉपिंग फेस्टिवलचे उद्‌घाटन भाजपा शहराध्यक्ष, आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते आज (गुरुवार) सकाळी 11 वाजता कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृह, भोसरी येथे होणार आहे. अशी माहिती स्थायी समिती अध्यक्ष नितीन लांडगे यांनी प्रसिध्दीस दिली आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि महिला आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत मिशन स्वावलंबन प्रकल्पातील भोसरीतील 33 बचत गटांसाठी दिवाळीनिमित्त स्टॉल उभारण्यात आले आहेत. या फेस्टिवलमध्ये दिवाळीनिमित्त लागणारे सर्व साहित्य तसेच बचत गटांच्या महिलांनी उत्पादित केलेल्या विविध आकर्षक वस्तूंना बाजारपेठ मिळून देण्याच्या उद्देशाने या फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले आहे.

या प्रदर्शनात फॅशन वेअर, ज्वेलरी, पॅक फुड, मसाले, पापड, लोणची, बॅग्स, गिफ्ट आर्टिकल्स, दिवाळीसाठी लागणारे आकर्षक पणत्या, आकाश कंदिल, मातीची भांडी, दिवाळी फराळ आदीं वस्तूंचे स्टॉल उभारण्यात आले आहेत, याचा नागरिकांनी लाभ घ्यावा. असे आवाहन स्थायी समितीचे अध्यक्ष नितीन लांडगे, नगरसेवक संतोष लोंढे, नगरसेविका भिमाताई फुगे, सोनाली गव्हाणे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *