Pimpri News : 16 पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या


Pimpri News : 16 पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या
Pckhabar-  पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी मोठे फेरबदल केले आहेत. आगामी महापालिका, नगरपरिषदेच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर 16 पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत.

बदली करण्यात आलेल्या पोलीस निरीक्षकांचे नावे खालील प्रमाणे (नाव, अगोदरची नियुक्ती, नवीन नियुक्ती)

पोलीस निरीक्षक किशोर ढोमन पाटील नियंत्रण कक्ष ते चिंचवड पोलीस ठाणे (गुन्हे)
रुपाली प्रल्हाद बोबडे नियंत्रण कक्ष ते पिंपरी पोलीस ठाणे (गुन्हे)

रावसाहेब बापूराव जाधव नियंत्रण कक्ष ते देहूरोड पोलीस ठाणे (वरिष्ठ निरीक्षक)

दीपक रामचंद्र साळुंखे नियंत्रण कक्ष ते भोसरी वाहतूक आणि वाहतूक व नियोजन विभाग

रणजित नारायण सावंत नियंत्रण कक्ष ते तळेगाव एमआयडीसी

रामचंद्र नारायण घाडगे नियंत्रण कक्ष ते विशेष शाखा 1,

मधुकर माणिकराव सावंत नियंत्रण कक्ष ते तळेगाव दाभाडे (वरिष्ठ निरीक्षक)

सुनील जनार्दन टोणपे वाकड पोलीस ठाणे ते सांगवी पोलीस ठाणे (वरिष्ठ निरीक्षक)

विश्वजित खुळे चिंचवड पोलीस ठाणे ते निगडी पोलीस ठाणे (गुन्हे)

राजेंद्र जयंतराव निकाळजे नियंत्रण कक्ष ते देहूरोड पोलीस ठाणे (गुन्हे)

वैभव काशीनाथ शिंगारे तळवडे वाहतूक ते चाकण पोलीस ठाणे

श्रीराम बळीराम पौळ खंडणी विरोधी पथक ते रावेत पोलीस चौकी

वसंतराव दादासो बाबर आर्थिक गुन्हे ते चिखली पोलीस ठाणे (वरिष्ठ निरीक्षक)

सतीश दत्तात्रय माने चिखली पोलीस ठाणे ते नियंत्रण कक्ष

शहाजी नारायण पवार तळेगाव दाभाडे ते नियंत्रण कक्ष

अजय विनायक जोगदंड हिंजवडी पोलीस ठाणे ते खंडणी विरोधी पथक.

आगामी पिंपरी चिंचवड महापालिका, तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर  पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी पोलीस निरीक्षकपदी मोठे फेरबदल केले आहेत. याशिवाय 17 नि: शस्त्र सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या प्रशासकीय कारणास्तव तात्पुरत्या स्वरुपात बदल्या करण्यात आल्या आहेत. तसेच 31 फौजदारांच्या देखील अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *