Pimpri Political News : भाजपाचे माजी नगरसेवक जगदीश शेट्टी, कामगार नेते नयन पालांडे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

Pimpri Political News : भाजपाचे माजी नगरसेवक जगदीश शेट्टी, कामगार नेते नयन पालांडे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

Pckhabar- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे भारतीय जनता पक्षाचे माजी नगरसेवक जगदीश शेट्टी व टाटा मोटर्स एम्पलॅाईज युनियन चे उपाध्यक्ष नयन पालांडे यांनी आज काँग्रेस चे शहराध्यक्ष कैलास कदम यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षात प्रवेश केला. पुष्पगुच्छ व काँग्रेस उपरणे देऊन त्यांचे स्वागत कदम यांच्या हस्ते करण्यात आले.

या प्रसंगी बोलताना जगदीश शेट्टी म्हणाले, “येणे-या काळात काँग्रेस पक्षाची सत्ता महानगरपालिकेच स्थापित करण्यासाठी प्रयत्न करणार आहे कैलास कदम यांच्या नियुक्तीने काँग्रेस पक्षात नवचैतन्य निर्माण झाले आहे”.

नयन पालांडे म्हणाले, “काँग्रेस पक्षात आज प्रवेश करत आहे व आगामी काळात कैलास कदमांच्या नेतृत्वाखाली पक्ष संघटना वाढीसाठी प्रयत्न करणार आहे”

खराळवाडी पिंपरी येथील हिंद कामगार संघटनेच्या हॅाल मध्ये झालेल्या या प्रवेश कार्यक्रमास शिक्षण मंडळाचे माजी सभापती रवी खन्ना, माजी नगरसेवक सदगुरू कदम, युवक काँग्रेस चे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे, काँग्रेस चे नेते संजीव झोपे, माऊली मलशेट्टी, आबा खराडे, अथर्व पालांडे, ऋषीकेश पालांडे, अथर्व घरत आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *