Dehugaon News : आमदार सुनील आण्णा शेळके युवा मंचातर्फे अष्‍टपैलू क्रिकेटपटू रमेश कंद यांचा विशेष सन्मान

Dehugaon News : आमदार सुनील आण्णा शेळके युवा मंचातर्फे अष्‍टपैलू क्रिकेटपटू रमेश कंद यांचा विशेष सन्मान

Pckhabar-आमदार सुनील आण्णा शेळके युवा मंच यांच्या वतीने व देहू पंचक्रोशीतील सर्व क्रिकेट खेळाडू व क्रिकेट प्रेमींच्या वतीने अष्‍टपैलू क्रिकेटपटू रमेश शंकर कंद यांचा क्रिकेट विश्वातील अष्टपैलू कामगिरीबद्दल विशेष सन्मान करण्यात आला.

यावेळी प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते मानपत्र देऊन त्यांना गौरविण्यात आले. याप्रसंगी पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस सुनील कडूसकर, प्राथमिक आरोग्य केंद्राचे प्रमुख डॉक्टर किशोर यादव ,मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस बाळासाहेब काळोखे , उद्योजक विवेक काळोखे, रोटरी क्लबचे सचिव योगेशभाऊ काळोखे, अभंग प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रवीण काळोखे, प्रा. संदीप भोसले, प्रशांत मोरे, विशाल झेंडे, देहू चे माजी उपसरपंच सचिन कुंभार, कट्टा मित्र मंडळाचे कार्याध्यक्ष सुभाष दादा कंद, सागर भसे, अमोल काळोखे, रोहित काळोखे, गोरख भाऊ काळोखे, रुपेश सोनुणे , शेखर कुंभार, चंद्रकांत भोसले, नवनाथदादा काळोखे, सागर मोरे, सुरेश गाडे, विनायक मोरे,दत्तात्रय गाडे, किरण दादा खेडकर, गणेशभाऊ हगवणे, प्रशांतदादा सुतार, प्रशांत हगवणे, अजिंक्य साकोरे, अमित मोरे आदी मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना डॉ.यादव सर यांनी खेळ माणसाला जीवन जगण्याची कला शिकवतो. कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीत विजय कसा मिळवायचा याचा आत्मविश्वास व आत्मबळ खेळातून माणसाला मिळत असते. रमेश यांच्या जीवनाकडे पाहून एक खिलाडू वृत्तीचा युवक कसा असावा याचा आदर्श सहजपणे मिळतो, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.

या कार्यक्रम प्रसंगी अनेक युवा खेळाडू , क्रिकेटप्रेमी व विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती लाभली होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. विकास कंद यांनी केले. कार्यक्रमाचे नियोजन आमदार सुनिल अण्णा शेळके युवा मंच व कट्टा मित्र मंडळ यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *