Dehuroad News : श्री राजेंद्र तरस सोशल फाउंडेशनतर्फे विकासनगरमध्ये ‘किल्ले बनवा’ स्पर्धा

Pckhabar- किवळे, विकास नगर येथील श्री राजेंद्र तरस सोशल फाउंडेशनच्या वतीने दिवाळीनिमित्त ‘किल्ले बनवा’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ३० ऑक्टोबरपर्यंत नाव नोंदणी करावी, असे आवाहन स्पर्धचे आयोजक व युवा सेना उपशहर अधिकारी राजेंद्र तरस यांनी केले आहे.
स्पर्धेत 20 वर्षांखालील मुलांना सहभागी होता येईल. स्पर्धेत एकूण पाच बक्षीस देण्यात येतील.
यामध्ये प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक मिळविणाऱ्या स्पर्धकांना अनुक्रमे ५००१, ४००१,३००१ असे रोख बक्षीस देऊन गौरविण्यात येणार असल्याची माहिती तरस यांनी दिली.










Leave a Reply