Pimpri News : कन्या विद्यालयात गरजू विद्यार्थिनींनी वह्या वाटप

Pimpri News : कन्या विद्यालयात गरजू विद्यार्थिनींनी वह्या वाटप


Pckhabar- रयत शिक्षण संस्थेच्या कन्या विद्यालय पिंपरी वाघेरे या शाळेत आज (मंगळवार) विद्यालयातील इयत्ता 5 वी ते 10 वी च्या वर्गातील गरजू विद्यार्थिनींना देणगी रूपाने मिळालेल्या वह्यांचे वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमासाठी कौशिक कोंढाळकर (माजी विद्यार्थी रयत शिक्षण संस्था) हे प्रमुख अतिथी व अक्षय देवकर, अनिकेत चव्हाण, ओंकार मगदूम, शुभम ननावरे , तुषार कोंढाळकर, विराज कदम हे अतिथीगण लाभले. यावेळी विद्यालयाच्या आदरणीय मुख्याध्यापिका शारदा शेटे , सन्माननीय पर्यवेक्षिका उर्मिला पाटील व अध्यापकवृंद उपस्थित होते.

कार्यक्रमच्या सुरुवातीला विद्यालयाच्या आदरणीय मुख्याध्यापिका शारदा शेटे यांनी कन्या विद्यालयात शिक्षण घेणाऱ्या काही विद्यार्थिनींच्या पालकांची आर्थिक स्थिती कमी उत्पन्न गटाची असल्याने अशा विद्यार्थिनींना शैक्षणिक मदत होणे आवश्यक आहे. समाजातील थोर देणगीदारांशी संपर्क साधून विद्यार्थिनींसाठी मदत मिळविण्यासाठी शाळेतील अध्यापकवृंदाचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले.

यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी कौशिक कोंढाळकर व त्यांच्या मित्र परिवारातर्फे देणगीरूपाने मिळालेल्या 1000 वह्या तसेच विद्यालयातील उपशिक्षिका सविता जाधव यांनी त्यांचे वडील कै. मारूतराव हरी सूर्यवंशी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दिलेल्या वह्या, तसेच उपशिक्षिका श्रीम पौर्णिमा सावंत यांनी त्यांचे वडील नंदकुमार सावंत यांचे वाढदिवसाच्या निमित्ताने दिलेल्या वह्या व उपशिक्षिका मनिषा निकम यांनी स्वतःच्या वाढदिवसाच्या निमित्ताने दिलेल्या वह्यांचे इयत्ता 5 वी ते 10 वी च्या एकूण 229 विद्यार्थिनींना अतिथींच्या हस्ते वाटप करण्यात आले.

यानंतर कार्यक्रमाचे अतिथी अनिकेत चव्हाण यांनी आपले मनोगत व्यक्त करताना विद्यालयाच्या मुख्याध्यापिका शारदा शेटे यांनी गरजू विद्यार्थिनींना शैक्षणिक साहित्यासाठी आवाहन केले व आमच्या समूहाने त्याला साद दिली. विद्यार्थिनींच्या शैक्षणिक प्रगतीत छोटासा खारीचा वाटा उचलण्याची विद्यालयाने संधी देऊन उपकृत केले असे मनोगत व्यक्त केले.

यावेळी उपस्थित अतिथींचा विद्यालयाच्या वतीने यथोचित सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे आभार विद्यालयाच्या सन्माननीय पर्यवेक्षिका उर्मिला पाटील यांनी व्यक्त केले. सूत्रसंचालन अनघा रांगणेकर यांनी केले व कार्यक्रम संपन्न झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *