Pimpri RTO News : पक्की अनुज्ञप्ती चाचणी 30 आणि 31 ऑक्टोबरला

Pckhabar-पिंपरी चिंचवड उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने 30 आणि 31 ऑक्टोबर रोजी सकाळी 9 वाजता पक्की अनुज्ञप्ती (पर्मनंट ड्रायव्हिंग लायसेन्स) चाचणी घेण्यात येणार असल्याची माहिती पिंपरी चिंचवड उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अतूल आदे यांनी दिली आहे.
उप प्रादेशिक परिवहन कार्यालयांतर्गत घेण्यात येणाऱ्या पक्की अनुज्ञप्तीसाठी ऑनलाईन वेळ घेण्याचा प्रतिक्षा कालावधी कमी करण्याच्या उद्देशाने आणि शिकाऊ अनुज्ञप्तीची मुदत ऑक्टोबर 2021 महिनाअखेरपर्यंत संपणाऱ्यांसाठी या विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सबंधीत अर्जदारांनी नोंद घेवून त्याप्रमाणे उपलब्ध ऑनलाईन वेळ घेण्याची (अपॉईंटमेंट) कार्यवाही पूर्ण करावी.
30 ऑक्टोबर रोजीच्या ऑनलाईन वेळा (स्लॉट) 28 ऑक्टोबर रोजी दुपारी 5 वाजता तसेच 31 ऑक्टोबर रोजीच्या चाचणीसाठी ऑनलाईन वेळा 29 ऑक्टोबर रोजी उपलब्ध होतील. त्या अनुषंगाने आवश्यक नोंदणी करून 30 ऑक्टोबर व 31 ऑक्टोबर 2021 रोजी पक्की अनुज्ञप्ती चाचणी करीता सकाळी 9 वाजता वेळेत उपस्थित रहावे.
पक्की अनुज्ञप्तीसाठी 28 व 29 ऑक्टोबर रोजी प्रत्येक दिवशी 250 चा कोटा उपलब्ध होणार आहे. चाचणीकरीता येताना मुखपट्टी व हातमोज्याचा तसेच सुरक्षित अंतर आदी कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाच्यावतीने करण्यात आले आहे.










Leave a Reply