Chikhali News : चिखलीत किल्ले बनवा स्पर्धा; रोख बक्षीसांसह शिवनेरी सहलीची संधी

Chikhali News : चिखलीत किल्ले बनवा स्पर्धा; रोख बक्षीसांसह शिवनेरी सहलीची संधी

Pckhabar-चिखली येथील स्व. दत्ता काका साने प्रतिष्ठानच्यावतीने दिवाळीनिमित्त किल्ले बनवा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ३० ऑक्टोबरपर्यंत नावनोंदणी करावी, असे आवाहन स्पर्धचे आयोजक व राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शहराध्यक्ष यश साने यांनी केले आहे.

स्पर्धेत १९ वर्षांखालील मुलांना सहभागी होता येईल. स्पर्धेत एकूण पाच बक्षीस देण्यात येतील. यामध्ये प्रथम, द्वितीय, तृतीय, चतुर्थ आणि पाचवा क्रमांक मिळविणाऱ्या स्पर्धकांना अनुक्रमे ५००१, ४००१,३००१, २००१ आणि १००१ असे रोख बक्षीस देऊन गौरविण्यात येणार आहे. शिवाय प्रमाणपत्र, किल्ले शिवनेरीची सहल आणि किल्ल्याचे छायाचित्र दाखविल्यास छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती भेट देण्यात येणार असल्याची माहिती साने यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *