Pimpri News : नागरवस्ती विभागाच्या मानधनावरील समुह संघटकांना मुदतवाढ द्या : उपमहापौर हिराबाई घुले यांची प्रशासनाला सूचना

Pimpri News : नागरवस्ती विभागाच्या मानधनावरील समुह संघटकांना मुदतवाढ द्या : उपमहापौर हिराबाई घुले यांची प्रशासनाला सूचना


Pckhabar- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नागरवस्ती विकास योजना विभागामार्फत विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येतात. सदर योजना राबविण्याकामी समुह संघटकांची मानधन तत्वावर  महापालिकेच्या सर्व क्षेत्रीय कार्यालय व मनपा मुख्यालय येथील समुह संघटकांना मुदतवाढ देण्याची सूचना उपमहापौर हिराबाई घुले यांनी महापालिका प्रशासनाला केली आहे.

 याबाबत महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना पत्र दिले आहे. त्यात उपमहापौर घुले यांनी म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नागरवस्ती विकास योजना विभागामार्फत विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येतात. सदर योजना राबविण्याकामी समुह संघटकांची मानधन तत्वावर  महापालिकेच्या सर्व क्षेत्रीय कार्यालय व मनपा मुख्यालय येथे नेमणूक करण्यात आलेली आहे.

 तसेच महापालिका हद्दीतील महिला व बालकांचे कल्याण, दारिद्र रेषेखालील व्यक्ती, गरीब, अपंग व मागासवर्गीय व्यक्तींच्या विकासाकरिता कल्याणकारी योजनांचे महत्वपूर्ण कामकाज करीत आहेत. सद्यस्थितीमध्ये मानधनावरील कार्यरत असलेल्या समुह संघटकांची मुदत नुकतीच संपुष्टात आलेली आहे.

नागरवस्ती विकास योजना विभागाच्या वरील विविध योजनांचा शहरातील नागरीक, विद्यार्थ्यांना विनाअडथळा लाभ मिळणेकामी मानधनावरील कार्यरत असलेल्या सर्व समुह संघटकांना मुदतवाढ देण्यात यावी, अशी सूचना उपमहापौर घुले यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *