Bhosari Crime News : बनावट कागदपत्रे सादर करून अल्पवयीन मुलाने केले लग्न

Bhosari Crime News : बनावट कागदपत्रे सादर करून अल्पवयीन मुलाने केले लग्न


Pckhabar- अल्पवयीन असताना देखील मुलाने 12 वीचा शाळा सोडल्याचा बनावट दाखल्याची झेरॉक्सप्रत सादर करून 18 वर्षीय मुलीवर फसवणूक करून आळंदी येथील एका मंगल कार्यालयात लग्न केले. ही घटना 27 सप्टेंबर 2021 रोजी आळंदीत घडली. याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी संबंधित मुलीच्या आईने भोसरी, एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. त्यानुसार अल्पवयीन मुलगा, एक महिला आणि राजू शिरसाठ (सर्व रा. पॉवर हाऊस, बालाजीनगर, भोसरी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची 18 वर्षाची मुलगी आहे. या मुलीचे अल्पवयीन मुलावर प्रेम होते. या प्रेमसंबंधातून अल्पवयीन मुलाने लग्न करण्यासाठी 12 वीचा शाळा सोडल्याचा बनावट दाखल्याची झेरॉक्सप्रत मंगल कार्यालयात सादर केली. अल्पवयीन मुलाने फिर्यादी यांच्या मुलीची फसवणूक करून लग्न केले. पोलीस उपनिरीक्षक जी. एल. चव्हाण तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *