Sangvi Crime News : पत्नीच्या छळाला कंटाळून पतीची आत्महत्या

Pckhabar- खोट्या केसमध्ये अडकविण्याची धमकी देत पत्नीसह सासर वाडीच्या मंडळींच्या त्रासाला कंटाळून पतीने आत्महत्या केली. ही घटना जुनी सांगवी येथे नुकतीच उघडकीस आली. याप्रकरणी पत्नीसह, चार जणांवर सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रसाद उमेशराव देशमुख (वय-34) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी त्यांच्या आईने सांगवी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार प्रसादची पत्नी, सासू, विशाल, राजेंद्र (पूर्ण नाव माहित नाही, सर्व रा. येरवडा, पुणे) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रसाद यांना आरोपी घरगुती कारणावरून वारंवार शिवीगाळ, दमदाठी करत होते. त्यांची पत्नी त्यांना खोट्या तक्रारीत अडकविण्याची धमकी देऊन नातेवाईकांशी संबंठ ठेवायचा नाही, असे म्हणत होती. त्यांची पत्नी तु मर असे म्हणून वारंवार मानसिक त्रास देत होती. या त्रासाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केली. सांगवी पोलीस तपास करत आहेत.










Leave a Reply