Talegaon Dabhade Crime News : एटीएम फोडण्याचा प्रयत्न करणार्या तिघांना रंगेहाथ पकडले

Pckhabar- स्क्रु ड्रायव्हरच्या सहाय्याने एटीएम फोडण्याचा प्रयत्न करणार्या तीन चोरट्यांना तळेगाव दाभाडे पोलिसांनी रंगेहाथ पकडून त्यांना अटक केली. ही कारवाई चाकण तळेगाव रोडवरील जी. पी. पारसिक सहकारी बँकेच्या एटीएममध्ये सोमवारी सकाळी सव्वा आठ वाजता केली.
लखवीरसिंग बलदेवसिंग (वय-27), रमेशकुमार लाजपत्राय चावला (वय-48), सिंधरसिंग मख्खनसिंग गगु (वय-34, तिघे रा. पंजाब) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी सुरक्षा रक्षक बालाजी रामराव सुडे (वय-63, रा. तळेगाव दाभाडे) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तळेगाव चाकण रस्त्यावरील जी. पी. पारसिक सहकारी बँकेच्या शेजारी बँकेचे एटीएम आहे. या एटीएममध्ये सोमवारी सकाळी सव्वा आठच्या सुमारास आरोपी लखबीरसिंग बलदेवसिंग घुसला. इतर दोन आरोपी बाहेर थांबले. आरोपी बलदेवसिंगहा स्क्रु ड्रायव्हरच्या सहाय्याने एटीएम फोडण्याचा प्रयत्न करत होता. त्याचवेळी घटनास्थळी आलेल्या पोलिसांनी आरोपींना रंगेहाथ पकडून अटक केली. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करत आहेत.










Leave a Reply