Pimpri News : शहर काँग्रेसमध्ये इनकमिंग सूरू; काँग्रेसमध्ये विविध पक्षातील कार्यकर्त्यांच्या प्रवेश

Pimpri News : शहर काँग्रेसमध्ये इनकमिंग सूरू; काँग्रेसमध्ये विविध पक्षातील कार्यकर्त्यांच्या प्रवेश


Pckhabar-पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस मध्ये काँग्रेस पक्ष विचारधारे वर तसेच नवनियुक्त काँग्रेस शहर अध्यक्ष कैलास कदम यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत आज शहरातील भारतीय जनता पक्ष, शेतकरी कामगार पक्षाच्या व सामाजिक संघटानातील कार्यकर्त्यांचे पक्ष प्रवेश करण्यात आले.

यामध्ये भारतीय जनता पक्षाचे झोपडपट्टी विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष विश्वनाथ जगताप, शेतकरी कामगार पक्षाच्या महिला शहर अध्यक्षा सौ.छाया देसले, काळेवाडी भागातील रॅायल फांऊडेशन या सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रवी नांगरे व ख्रिश्चन एकता मंच संघटनेचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रकाश पठारे यांनी आपल्या समर्थकांसहित आज खराळवाडी पिंपरी येशील हिंद कामगार संघटनेच्या हॅाल मध्ये काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

या प्रसंगी पक्ष प्रवेश केलेले विश्वनाथ जगताप, सौ. छायाताई देसले, रवी नांगरे व प्रकाश पाठारे यांनी मनोगते व्यक्त केली.

भाजपा झोपडपट्टी विभागाचे माजी प्रदेश उपाध्यक्ष विश्वनाथ जगताप म्हणाले, “काँग्रेस ची विचार धाराच या काळात देशाला सांभाळू शकते व या विचारधारेवर देशातील जनतेचा, गोर गरीब, सर्व धर्मीयांचा व सर्वसामान्यांचा विश्वास आहे व तो विश्वास कैलास कदमांच्या रूपाने शहरात सिध्द करत काँग्रेस कार्यकर्ते परिवर्तन घडविणार आहेत अशीच परिस्थिती सद्य स्थितीत आहे”

शेतकरी कामगार पक्षाच्या माजी महिला शहर अध्यक्षा सौ.छायाताई देसले म्हणाल्या, “सध्या च्या परिस्थितीत देशाला काँग्रेसची गरज आहे, वाढती महागाई इंधन दरवाढ व इतरही अनेक सामाजिक समस्यांना कारण भाजपा चे धोरण आहे, मनपा मध्ये सुध्दा भ्रष्टाचाराने कळस गाठला आहे या परिस्थिती त प्रभावी असलेल्या काँग्रेस च्या समतावादी विचारांमुळे व कैलास कदमांच्या नियुक्ती मुळे शहरात उत्साह निर्माण झाला आहे व त्यामुळे आज पक्ष प्रवेश करत आहे”

कैलास कदम म्हणाले,
“आपला सर्वांचा पक्षात मानसन्मान राखला जाईल व नव्याने प्रवेश करणा-या सर्वांना पक्ष संघटनेत योग्य स्थान देऊन निर्णय प्रक्रियेत योग्य स्थान दिले जाईल, तसेच येणारा काळ हा अत्यंत महत्वाचा असून त्यात आपले सर्वांचे
योगदान शहरात सत्ता परिवर्तनाच्या लढ्यात महत्वपूर्ण राहील याचा मला विश्वास आहे आपले पक्षात स्वागत करताना मला मनस्वी आनंद होत आहे.”

या प्रसंगी काँग्रेस चे शहराध्यक्ष कैलास कदम, युवक काँग्रेस चे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे, पिपंरी चिचंवड काँग्रेस सांस्कृतिक विभागाचे शहराध्यक्ष गणेश नांगरे, पिंपरी विधानसभा युवक काँग्रेस चे अध्यक्ष हिराचंद जाधव, शहर काँग्रेस एस सी विभागाचे शहराध्यक्ष बाबा बनसोडे, एस सी विभागाचे शहर उपाध्यक्ष विजय ओव्हाळ, आबा खराडे, माऊली मलशेट्टी, बबलू तामचीकर, नाना गायकवाड, दिपक गंगावणे, बबलू जोसेफ, बाबू राठोड, प्रथम नांगरे, प्रतिक धावारे, अल्ताफ शेख आदि उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *