Pimpri Crime News : तलवारीचा धाक दाखवून दुचाकीस्वाराला लुटले

Pckhabar- दुचाकीवरून जात असताना पाठीमागून दुचाकीवरून आलल्या दोघापैकी एकाने तरूणाची कॉलर पकडून खाली पाडत तलवारीचा धाक दाखवून 75 हजार रूपयांची सोन्याची चैन हिसकावून नेली. ही घटना रविवारी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास चिंचवड, ऑटो क्लस्टर समोर घडली.
प्रशांत प्रदिप चौधरी (वय-36, रा. शाहूनगर) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार दोन अनोळखी व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे रविवारी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास चिंचवड येथील ऑटो क्लस्टर समोरील रस्त्यावरून दुचाकीने जात होते. पाठीमागून दुचाकीवरून आलेल्या दोघांपैकी एकाने प्रशांत यांची कॉलर पकडली. त्यामुळे त्यांचा तोल जावून ते दुचाकीसह खाली पडले. एकाने त्यांच्या पोटावर पाय देवून शिवीगाळ करत मारहाण केली. तसेच खिशात जेवढे पैसे आहेत, तेवढे देण्याची मागणी करत त्यांच्या गळ्यातील 75 हजार रूपये किंमतीची सोन्याची चैन जबरदस्तीने हिसकावून नेली. पिंपरी पोलीस तपास करत आहेत.










Leave a Reply