Pimpri News : पेन्शन वेळेत मिळण्याच्या मागणीसाठी प्रहारचे महापालिकेसमोर आंदोलन

Pimpri News : पेन्शन वेळेत मिळण्याच्या मागणीसाठी प्रहारचे महापालिकेसमोर आंदोलन

आंदोलनानंतर प्रशासनाला जाग, दोन दिवसात पेन्शन जमा करण्याचे आश्वासन

अपंगांची दिवाळी होणार गोड

Pckhabar- प्रहार अपंग क्रांती आंदोलन पिंपरी-चिंचवड शहराच्या वतीने आज ( सोमवार) पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत अपंग व्यक्तींना मिळत असलेली दोन हजार रुपये पेन्शन 25 तारीख उजाडली तरी मिळाली नाही. याचा जाब विचारण्यासाठी अपंग बांधवांसह आंदोलन करण्यात आले.

यावेळी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे उपायुक्त अजय चारठाणकर दिव्यांग कक्षेचे सहाय्यक आयुक्त श्रीनिवास दांगट यांच्याबरोबर प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटनेच्या शिष्टमंडळाची बैठक झाली यावेळी त्यांनी 2200 अपंगांची पेन्शन जमा केलेली असून सोळाशे अपंगाची पेन्शन दोन-तीन दिवसात जमा करणार असल्याचे सांगितले.

ऑक्टोबर महिन्याची पेन्शन दिवाळीपूर्वी म्हणजे येत्या तीस तारखेपर्यंत देणार,अपंग व्यक्तींची दिवाळी गोड होणार आहे. तसेच दिवाळीसाठी दहा हजार रुपये अनुदान मिळावे अशी मागणी प्रहारच्या वतीने करण्यात आली होती त्याबाबतचा प्रस्ताव तयार केला. असल्याचे यावेळी अधिकाऱ्यांनी सांगितले. आंदोलनकर्त्यांना सामोरे जाऊन दिव्यांग कक्षाचे सायक आयुक्त श्रीनिवास दांगट यांनी सर्व अपंगान समोर माहिती दिली.

यावेळी प्रहार अपंग क्रांती आंदोलन पिंपरी-चिंचवड शहराचे उपाध्यक्ष राजेंद्र वाकचौरे, महिला अध्यक्ष संगीता जोशी, संगीता पटेल, राजू विटकर, अशोक भोपळे, सारिका राजपूत ,रामू जाधव ,दामोदर अवसरे, राजाराम पाटील आदी सैनिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *