Chinchwad News: …तर समृद्धीच्या शिखरापासून कोणी रोखू शकणार नाही : श्याम सिंग

Pckhabar- दुसर्या महायुद्धात जपान देश बेचिराग झाला. जपान देशाचा संपूर्ण पराभव होऊन देखील जपानच्या नागरिकांना पराभव कधीच मान्य केला नाही. तेथील नागरिकांनी कायझेन, पोका योके, कानबान आदी तंत्रज्ञान शोधून देशातील नागरिकांना प्रशिक्षित केले. त्याच्या जोरावर जागतिक बाजारपेठेत जपान या छोट्याशा देशाचे नाव वैभवाच्या शिखरावर नेऊन ठेवले. त्यानंतर कोरिया, चीन देशांनी देखील जपानची प्रेरणा घेत उद्योग विश्वात आपण वेगळा ठसा निर्माण केला. आता आपल्या भारताची वेळ आली आहे. उद्योजकांच्या गरजा, सरकारी धोरणे व परस्परात ताळमेळ असेल तर, आपल्या देशाला विकासापासून कोणीच रोखू शकणार नाही. चांगल्या गोष्टीचे अनुकरण करा. प्रत्येकजण शिक्षण गुणवत्तेचा पाया आहे हे लक्षात ठेवा. गुणवत्ता हे आदर्श जीवनाचे अविभाज्य अंग आहे.
उत्पादनाची पद्धत व सेवा यात सातत्याने सुधारणा करीत राहिले. तर, भारत देश जागतिक बाजारपेठेत अग्रेसर राहून समृद्धीच्या शिखरावर असेल अशा शब्दात टाटा मोटर्सच्या कंपनीने कार प्लांट हेड शाम सिंग यांनी मार्गदर्शन केले.
क्वालिटी सर्कल फोरम ऑफ इंडिया पुणे शाखेच्या वतीने 36 वे चॅप्टर कन्व्हेन्शन पार पडले. त्यात अहमदाबाद, बेलगम, कागल, नाशिक, मुरबाड, रांजणगाव, बारामती, पुणे, सांगली, जेजुरी, पिंपरी चिंचवड परिसरातील टाटा ग्रुप, मिंडा ग्रुप, जेसीबी ग्रुप, किर्लोस्कर ग्रुप, आनंद ग्रुप, भारत इलेक्ट्रॉनिक्स आदी 51 उद्योग समूहातील 174 संघातून एकूण 730 जणांनी सहभाग नोंदवला. 140 संघांनी औद्योगिक समूहात जनजागृतीसाठी गुणवत्तेविषयी प्रबंध सादरीकरण केले. त्यात 19 पोस्टर 06 श्लगण तीन स्पर्धकांनी कविता स्पर्धेत सहभाग घेतला. दिवसभरात दोन सत्रात झालेल्या स्पर्धेत परीक्षण व्यंकटेश पेद्दी, श्यामकांत दिक्षित, हनुमंत बनकर, नरेंद्र रुमाले, रंजीत जाधव, विनय पाटील, सिद्धार्थ धर यांनी केले.
पारितोषिक वितरण समारंभ जेसीबी इंडिया उद्योग समूहातील ऑपरेशन हेड अतुल कुलकर्णी यांच्या हस्ते विजेते संघाना व वैयक्तिक विजेत्यांना सुवर्ण व रजक पदक स्मृतिचिन्ह स्वरुपात देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी फोरमच्या विजया रुमाले, ललिता परदेशी, भूपेश माल यांनी विजेत्यांचे वाचन केले.
भोसरी विभागाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. शैलजा भावसार म्हणाल्या, येथील क्वालिटी सर्कल एक्सलन्स सेंटरच्या संचालकांनी कोरोना प्रादुर्भाव काळात महापालिकेला सेंटर उपलब्ध करून दिले. त्याबद्दल विशेष आभार मानले.
प्रास्ताविकात अनंत क्षीरसागर म्हणाले, आजच्या स्पर्धा शासनाच्या नियमानुसार पार पडत असून सदर स्पर्धा क्वालिटी सर्कल फोरम ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. सतीश काळोखे व पुणे शाखेच्या अध्यक्षा डॉ. रजनी इंदुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेचे नियोजन फोरमचे चंद्रशेखर रुमाले व प्रशांत बोराटे यांनी केले.










Leave a Reply