
Lonavala News: लोणावळ्यातील पर्यटन विकासाला चालना द्या ; पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे मागणी
Pckhabar-लोणावळा शहराला पर्यटनाचा दर्जा मिळावा व शहर व परिसरातील पर्यटन स्थळे विकसीत करण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र शासनाकडून अतिरिक्त निधी उपलब्ध व्हावा ह्यासाठी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांची लोणावळा शहर शिवसेना पदाधिकाऱ्यांनी सह्याद्री अतिथीगृहावर भेट घेतली .
शिवसेना पुणे जिल्हा संपर्क प्रमुख सचिन आहिर यांच्या उपस्थितीत पुढील काही दिवसात संबंधित विभागाचे शासकीय अधिकारी यांची संयुक्त बैठक बोलवून यांच्याशी चर्चा करून पुढील कार्यवाहीचे आश्वासन यावेळी आदित्य ठाकरे यांनी सर्व प्रमुख पदाधिकारी व नगरसेवक यांना दिले असल्याची माहिती शहरप्रमुख बाळासाहेब फाटक यांनी दिली. शहरप्रमुख बाळासाहेब फाटक यांच्यासह नगरसेवक माणिक मराठे , शिवदास पिल्ले , नगरसेविका कल्पना आखाडे , सिंधू परदेशी आदींसह प्रमुख पदाधिकारी यावेळी उपस्थित होते .










Leave a Reply