Pimpri News : पेट्रोलियम कंपन्यांवर सरकारने छापेमारी करावी : अ‍ॅड. आप्पासाहेब शिंदे

Pimpri News : पेट्रोलियम कंपन्यांवर सरकारने छापेमारी करावी : अ‍ॅड. आप्पासाहेब शिंदे
Pckhabar- पेट्रोल, डिझेलच्या किंमतीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. पेट्रोलच्या किंमतीने 112 रूपयांचा टप्पा ओलांडला असून  डिझेलच्या किंमतीने शंभरी ओलांडली आहे. इंधनाच्या वाढत्या दरामुळे ऐनसणासुदीच्या काळात महागाईने नवा उच्चांक गाठला असून सर्वसामान्य नागरिकांचे जगणे मुश्कील झाले आहे. त्यामुळे सरकारने  सरकारने पेट्रोलियम कंपन्या ताब्यात घ्याव्यात. राष्ट्रीय तेल किमती ठरविण्याचे अधिकार स्वतःकडे घ्यावेत. तेल कंपन्यांवर ईडी व प्राप्तीकर छापेमारीच्या कार्यवाही करावी, अशी मागणी पिंपरी-चिंचवड चेंबर ऑफ इंडस्ट्रीज कॉमर्स, सर्व्हिसेस आणि अ‍ॅग्रिकल्चरचे अध्यक्ष अ‍ॅड. आप्पासाहेब शिंदे यांनी केली आहे.

याबाबत अ‍ॅड. शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ई-मेलव्दारे निवेदन पाठविले आहे. निवेदनात म्हटले आहे की, पेट्रोल, डिझेलच्या किंमतीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. इंधनाच्या वाढत्या दरामुळे ऐनसणासुदीच्या काळात महागाईने नवा उच्चांक गाठला असून सर्वसामान्य नागरिक यामध्ये भरडला जात आहे. सरकार आणि तेल कंपन्या इंधनामधून जतनेची एक प्रकारे लुटच करत आहेत. दररोज होणीर इंधन दरवाढ ऱोखण्यासाठी सरकारने कठोर पावले उलचून पेट्रोलियम कंपन्या ताब्यात घ्याव्यात. ’तेलाच्या विक्रीचा दर ठरविण्याचा अधिकार सरकार ऐवजी कंपन्यांना दिल्याने दरवाढ प्रक्रिया पूर्णतः निष्क्रीय झाली आहे. इंधनाचे दर ठरविण्याचे अधिकार स्वतःकडे घ्यावेत. तेल कंपन्यांवर ईडी व प्राप्तीकर छापेमारीच्या कार्यवाही करावी.
यूपीए सरकार असताना पेट्रोलचा दर 60 रुपये, डिझेल 50 रुपये होते. तेल उत्पादन खर्चासह पेट्रोल प्रती 30 रुपये लिटर पडते. दोन्ही सरकारचे कर 60 टक्के मिळवल्यास 30 रुपये अधिक व 18 रुपये कर अधिक होत आहे. प्रती लिटर 50 रुपये नफा मिळवत असताना कंपन्या सरकारला वर्षाला केवळ दीड ते दोन हजार कोटींचा डिव्हिडंड देत दिशाभूल करत आहे. करदात्यांना सरकारच्या तेल धोरणाविषयी शंका असल्याचेही अ‍ॅड. शिंदे यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *