Nigdi News : यमुनानगरमध्ये नवदुर्गा सन्मान, महिला स्वसंरक्षण मार्गदर्शन शिबिर

Nigdi News : यमुनानगरमध्ये नवदुर्गा सन्मान, महिला स्वसंरक्षण मार्गदर्शन शिबिर


– भाजपा युवा मोर्चा व मणिकर्णिका प्रतिष्ठानचा पुढाकार

Pckhabar-समाजात आपापल्या क्षेत्रात गेली अनेक वर्षे उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल महिला भगिनींचा शारदीय नवरात्रोत्सव निमित्त यमुनानगर निगडी भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष गिरीष देशमुख, त्यांच्या पत्नी प्रियांका देशमुख व मणिकर्णिका प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने नवदुर्गा सन्मान सोहळा आयोजित केला.

 यमुनानगर परमपूज्य माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी स्केटिंग स्टेडियम येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. नवदुर्गा सन्मान करताना आयोजकांनी नऊ विविध क्षेत्र निवडली आहेत. त्यात राजकीय क्षेत्र अंतर्गत नवदुर्गा म्हणून महापौर माई ढोरे ह्यांचा सन्मान करण्यात आला. ह्यासोबतच महिलांसाठी स्व संरक्षणाचे प्रात्येक्षिकं व त्यावर आधारित मार्गदर्शन सत्र घेण्यात आले होते. सौदामिनी campaign संस्थेचे मोरे सर व त्यांच्या टीमने हे सत्र घेतले. त्यासोबतच यमुनानगर मधील मणिकर्णिका शाखेने देखील ह्या वेळी लाठी-काठी (दंडाचे) आणि नियुद्धचे प्रात्येक्षिक सादर केले. India’s Got Talent ह्या नावाजलेल्या टीव्ही शो मध्ये यमुनानगर मधून सहभागी झालेली अबोली नगरकर हिने कार्यक्रमाच्या सुरुवातीला नृत्याविष्कार सादर केला.

कार्यक्रमाला नगरसेवक व पिं चिं मनपाचे क्रीडा कला व सांस्कृतिक समितीचे सभापती उत्तम केंदळे ह्यांचे विशेष सहकार्य लाभले.

या कार्यक्रमाला महापौर माई ढोरे, नगरसेवक प्रा उत्तम केंदळे , नगरसेविका कमलताई घोलप,भाजप युवा मोर्चा शहराध्यक्ष संकेत चोंधे, शहर सरचिटणीस तथा स्वीकृत नगरसेवक दिनेश यादव, शहर उपाध्यक्ष शिवराज लांडगे, भाजप प्रभाग १३ अध्यक्ष रंगनाथ पवार, शहर प्रज्ञावंत आघाडी संयोजक दिपक काका कुलकर्णी निगडी चिखली मंडल सरचिटणीस रमाकांत पाटील, मंडल चिटणीस चंद्रकांत शेडगे , भाजप युवा मोर्चा शहर सचिव आदित्य कुलकर्णी, प्रभाग सरचिटणीस शेखर आसरकर काका व अनेक मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *