Chinchwad News: चिंचवडगावात  दिवाळी शॅपिंग फेस्टिवल प्रदर्शनाचे उदघाटन

Chinchwad News: चिंचवडगावात  दिवाळी शॅपिंग फेस्टिवल प्रदर्शनाचे उदघाटन

Pckhabar- आगामी दिवाळी सणानिमित्त मोरया यात्री निवास चिंचवडगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या दिवाळी शॅपिंग फेस्टिवल या प्रदर्शनाचे उदघाटन महापौर उषा उर्फ माई ढोरे यांचे हस्ते करण्यात आले.

महिलांच्या उत्पादित मालाकरिता बाजारपेठ मिळावी तसेच दिवाळी सणानिमित्त विविध साहित्य, पदार्थांची ग्राहकांकडून होणारी मागणी लक्षात घेऊन समर्थ एव्हेंट व सांस्कृतिक आघाडी भाजप यांच्या संयुक्त विद्यमाने दिवाळी शॉपिंग फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले आहे. आगामी दिवाळी सणानिमित्त महिलांच्या उत्पादित मालास बाजारपेठ मिळण्यासोबतच ग्राहकांना आवश्यक वस्तू, साहित्य, खाद्यपदार्थ खरेदी करण्याची संधी लाभलेली असून त्याचा ग्राहकांनी जरुर फायदा घ्यावा असे मत महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले.

यावेळी नगरसदस्य राजेंद्र गावडे, ऍड. मोरेश्वर शेडगे, चिंचवड देवस्थानचे मुख्य विश्वस्त मंदार देव महाराज, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सतिश जाधव, सांस्कृतिक आघाडी प्रदेश पदाधिकारी नरेंद्र आमले, जेष्ठ नेते महेश कुलकर्णी तसेच या कार्यक्रमाचे मुख्य संयोजक धनंजय शाळीग्राम व तपन इनामदार आदी उपस्थित होते.

महापौर उषा उर्फ माई ढोरे पुढे बोलताना म्हणाल्या की, कोरोना संबंधी शासनाचे सर्व नियम, सुचना लक्षात घेऊन व योग्य ती सर्व खबरदारी घेऊन प्रदर्शनात मांडलेल्या विविध उत्पादित वस्तू, साहित्य, खाद्यपदार्थ खरेदीचा आनंद घ्यावा असेही त्या म्हणाल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *