Pimpri News :  स्मार्ट सिटीतील भ्रष्टाचाराविरोधात शिवसेनेचे  महापालिकेत आंदोलन

Pimpri News :  स्मार्ट सिटीतील भ्रष्टाचाराविरोधात शिवसेनेचे  महापालिकेत आंदोलन
Pckhabar- पिंपरी चिंचवड महापालिकेत सत्ताधारी भाजपकडून सुरू असलेल्या भ्रष्टाचाराचा निषेध करण्यासाठी शुक्रवारी महापालिका मुख्यालयातील महापौर कक्षासमोर जोरदार घोषणाबाजी करून आंदोलन केले.  या आंदोलनात आंदोलकांपैकी एकाला किरीट सोमय्या यांचा मुखवटा घालण्यात आला होता. त्याच्याकडे महापालिकेतील स्मार्टसिटी गैरव्यवहाराची फाईल सोपवून पालिकेतील गैरव्यवहाराची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली. मुखवटा घातलेल्या आंदोलकाने सोमय्या यांच्या शैलीत बोलून भाजपला क्लीनचिट दिली. यानंतर किरीट सोमय्या धाडस दाखवा, धाडस दाखवा,या सरकारचे करायचे काय खाली डोके वर पाय अशी घोषणाबाजी करण्यात आली.

शिवसेना जिल्हा संघटिका सुलभा उबाळे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात शिवसेना सहसंपर्क प्रमुख योगेश बाबर, माजी आमदार गौतम चाबुकस्वार, शहरप्रमुख सचिन भोसले,
शिवसेना गटनेते राहुल कलाटे, राजेश वाबळे, धनंजय आल्हाट आदींनी भाग घेतला. या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे आणि नगरसेवक अजित गव्हाणे, विक्रांत लांडे सहभागी झाले होते.

शिवसेना जिल्हा संघटिका  सुलभा उबाळे म्हणाल्या, स्मार्ट सिटीच्या नावाखाली सत्ताधारी भाजपाने करदात्यांच्या तिजोरीवर दरोडा टाकला आहे. ईडी, सीबीआयच्या माध्यमातून भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे बाहेर काढणाऱ्या भाजपा नेते किरीट सोमय्यांना या प्रकरणांबद्दल पत्र दिले असता त्यांची अक्षरशः बोबडी वळली अन् तोंड बंद झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *