Talegaon Dabhade Crime News : एटीएम कार्डची अदलाबदल करून वृध्दाची फसवणूक

Talegaon Dabhade Crime News : एटीएम कार्डची अदलाबदल करून वृध्दाची फसवणूक

चार दिवसातील दुसरी घटना

ज्येष्ठ नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन

Pckhabar- मिनी स्टेटमेंट काढण्यासाठी एमटीएममध्ये गेलेल्या वृध्दाला मदत करण्याच्या बहाण्याने एका भामट्याने एटीएम कार्डची अदलाबदल करून वृध्दाच्या कार्डमधून 81 हजार रूपये काढून घेत फसवणूक केली. ही घटना तळेगाव दाभाडे, शांताई सिटी येथील एसबीआय बँकेच्या एटीएममध्ये बुधवारी सकाळी घडली.

सुभाष रामकृष्ण भोपे (वय-81, रा. वैद्य कॉलनी, तळेगाव दाभाडे) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञात आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी भोपे बुधवारी सकाळी शांताई सिटी येथील एसबीआय बँकेच्या एटीएममध्ये मिनी स्टेंटमेंट काढण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांचा विश्वास संपादन करून मदत करण्याच्या बहाण्याने भामट्याने एटीएम कार्डची अदलाबदल केली. फिर्यादी यांच्या एटीएमचा वापर करून 81 हजार रूपये काढून घेत त्यांची फसवणूक केली. फौजदार झोल अधिक तपास करत आहेत.

दरम्यान, चार दिवसापूर्वीच सांगवीमध्ये अशाच प्रकारे एटीएमची अदला बदल करून ज्येष्ठ नागरिकांची 60 हजार रुपयांची फसवणूक केली होती. चार दिवसात दुसरी घटना घडल्याने चोरटे ज्येष्ठ नागरिकांना टार्गेट करत असल्याचे दिसून येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *