Dehugaon News : माहेरच्या साडीसाठी सहयोगाचे आवाहन

Dehugaon News : माहेरच्या साडीसाठी सहयोगाचे आवाहन

Pckhabar-अहमदनगर येथील स्नेहालय संस्थेच्या माध्यमातून वंचित व गरजू महिला भगिनींसाठी खूप मोठे सेवाकार्य सातत्याने सुरू आहे. दिवाळीनिमित्त अशा महिला भगिनींसाठी साडीची सुंदर भेट देऊन दिवाळीला सदिच्छा देण्याचा उपक्रम दरवर्षी केला जातो. यावर्षी तीर्थक्षेत्र देहूगाव येथील अभंग प्रतिष्ठानच्या माध्यमातून स्नेहालयच्या या उपक्रमास सहकार्य करण्याच्या सेवाभावनेतून आपणही ’माहेरची साडी सहयोग’ या उपक्रमात सहभागी होत आहोत. आपण या उपक्रमात सहभागी होऊन किमान एक साडी आपल्या भगिनींसाठी दिवाळीची सदिच्छा भेट म्हणून देऊया.

आपली ही भेट या आपल्या बहिणीसाठी अनमोल ठरणार आहे. त्यांचा आनंद वृद्धिंगत करणारी आहे. तेव्हा आपणास ही माहेरची साडी स्नेहालय संस्थेतील सेवाभावी कार्यास भेट देण्यासाठी आपण खालील क्रमांकावर संपर्क करावे.
नागरिकांनी आपण जी साडी भेट देत आहोत ही साडी नवीन असेल, ही गोष्ट लक्षात घेऊन आपण भेट द्यावी ही प्रेमळ अपेक्षा.

आपण भेट देत असलेल्या साडीची किंमत महत्त्वाची नाही आपल्या मनातील भावना अनमोल आहे. दि.  28 ऑक्टोबर 2021 पर्यंत आपली ही साडीची भेट आपण द्यावी, असे आवाहन अभंग प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.

साडी भेट देण्यासाठी मो नं.: 9823959293/ 8888828716/ 9881619086/ 9881183555/ 98811352551 / 9822286353 या क्रमांकावर संपर्क साधावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *