
Chinchwad News : नगरसेविका अश्विनी चिंचवडे यांची शिवसेनेतून हकालपट्टी
Pckhabar- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नगरसेविका अश्विनी गजानन चिंचवडे यांनी पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे त्यांची मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे, अशी माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे.
शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे यांनी नुकतेच शिवसेनेला जय महाराष्ट्र करून भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांच्या पत्नी अश्विनी चिंचवडे या फक्त नावाला शिवसेनेत होत्या. त्यांच्या कार्यक्रमाला, फलकांवर भाजपचे चिन्ह आणि नेते दिसू लागले होते. याच पाणी पार्श्वभूमी अश्विनी चिंचवडे यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे.
दरम्यान, चिंचवडे या चिंचवड गावातून शिवसेनेच्या तिकीटावर 2012 आणि 2017 मध्ये अशा दोन वेळा नगरसेविका म्हणून निवडून आल्या होत्या.










Leave a Reply