Pimpri RTO News : परमनंट लायन्ससाठी विशेष ‍शिबीराचे आयोजन

Pimpri RTO News : परमनंट लायन्ससाठी विशेष ‍शिबीराचे आयोजन


Pckhabar- वाहन चालवण्यासाठी आवश्यक शिकाऊ अनुज्ञप्तीची (लर्निंग लायसेन्स) मुदत ऑक्टोबर 2021 अखेर संपणाऱ्या उमेदवारांकरीता पक्की अनुज्ञप्ती मिळण्याच्यादृष्टीने पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे विशेष शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती परिवहन अधिकारी अतूल आदे यांनी दिली आहे.

पक्क्या अनुज्ञप्तीकरीताच्या ऑनलाईन अपॉईंटमेंटचा प्रतिक्षा कालावधी कमी करण्यासाठी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. पक्क्या अनुज्ञप्तीच्या चाचणीसाठी 21 व 22 ऑक्टोबर रोजी सायं. 5 वाजता ऑनलाईन वेळ उपलब्ध होईल. त्या अनुषंगाने वेळ आरक्षित (स्लॉट बुक) करुन शनिवार 23 आणि रविवार 24 ऑक्टोबर रोजी चाचणीसाठी सकाळी 9 वाजता उपस्थित रहावे. येणाऱ्या उमेदवारांनी कोरोनाविषयक सर्व नियमांचे पालन करावे, असे आवाहन पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अतूल आदे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *