Talegaon Dabhade News : संगीत खुर्ची स्पर्धेत श्रावणी गोरे, अनुज पवार, श्रध्दा गोरे, पप्पू पाटील विजयी

Talegaon Dabhade News : संगीत खुर्ची स्पर्धेत श्रावणी गोरे, अनुज पवार, श्रध्दा गोरे, पप्पू पाटील विजयी


Pckhabar- नेस्ट सोसायटीमध्ये सी आणि डि विंगच्या वतीने कोजागिरी पोर्णिमेनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या संगीत खुर्ची स्पर्धेला सोसायटीमधील सभासदांनी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

तळेगाव दाभाडे, मोहननगर येथील सिद्धिविनायक नेस्ट सोसायटीमध्ये मंगळवारी रात्री संगीत खुर्ची, दांडियाचे आयोजन करण्यात आले होते. संगीत खुर्ची स्पर्धा चार गटात झाली. लहान गटातील विजेत्या श्रावणी गोरेला 12 बिस्किट पुडे, चाॅकलेट, मोठ्या गटात विजयी झालेल्या अनुज पवारला 12 बिस्किट पुडे, 1 चाॅकलेट बक्षीस म्हणून देण्यात आले.

महिला गटात विजयी झालेल्या श्रध्दा गोरे यांना साडी तर पुरुष गटात विजयी झालेल्या पप्पू पाटील यांना घड्याळ भेट देण्यात आले. सर्व बक्षीस सोसायटीमधील सभासद आणि उद्योजक अवधूत खडप यांच्या वतीने बक्षिसे देण्यात आली. यानंतर सर्व सभासदांना मसाला दूध देण्यात आले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सी आणि डि विंगमधील सर्व सभासदांनी विशेष प्रयत्न केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *