Chinchwad News : भाजपकडून महापालिकेत सत्तेचा गैरवापर; त्यांना खड्यासारखे बाजूला करा : शरद पवार

Pckhabar- पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या माध्यमातून भारतीय जनता पक्ष सत्तेचा गैरवापर करत आहे. घराघरातून त्याबद्दल ऐकायला मिळत आहे. जनतेची लूट सुरू असून येणाऱ्या महापालिका निवडणुकीत त्यांना खड्यासारखे बाजूला करा, असे आवाहन
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शहरवासीयांना केले. पवार यांनी कार्यकर्ता मेळाव्यातून एक प्रकारे महापालिका निवडणुकीचे रणशिंगच फुंकले आहे.
आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत आज ( रविवार) रहाटणी येथे कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी ज्येष्ठ नेते पवार बोलत होते. गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार अण्णा बनसोडे, शहराध्यक्ष संजोग वाघेरे, माजी आमदार विलास लांडे, आझम पानसरे, योगेश बहल, अतूल शितोळे, राजेंद्र जगताप, शाम जगताप आदी मान्यवर उपस्थित होते.






Leave a Reply