Hinjewadi Crime News : ऑनलाईन बेटींग घेणार्‍यांवर कारवाईसाठी गेलेल्या पोलिसाला ढकलून दिले; सात जणांना अटक

Hinjewadi Crime News : ऑनलाईन बेटींग घेणार्‍यांवर कारवाईसाठी गेलेल्या पोलिसाला ढकलून दिले; सात जणांना अटक


Pckhabar-एका सोसायटीतील फ्लॅटमध्ये बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या ऑनलाईन बेटींग घेणार्‍यांवर कारवाईसाठी गेलेल्या पोलिसाला फ्लॅटमध्ये येण्यास मज्जाव करू त्यांना ढकलून दिले. ही घटना हिंजवडी फेज-2 हायमाऊन्ट सोसायटी येथे शुक्रवारी पहाटे सव्वा चारच्या सुमारास घडली.  याप्रकरणी पोलिसांनी आठ जणांवर गुन्हा दाखल करून सात जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून सव्वा चार लाखांचे साहित्य जप्त केले आहे.
नारदमुनी नंदजी राम (वय-30), जयकुमार कुंदन मेहता (वय-18), सतिष कृष्णा कन्सारी (वय-29), चिंटूकुमार रामस्वरूप गुप्ता (वय-29), विक्रम महादेव काळे (वय-22), दिपक अशोककुमार सहा (रा.झारखंड), हरिशकुमार जी बैरागी (वय-24, सर्व रा.  हायमाऊन्ट सोसायटी, हिंजवडी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. तर चंद्रकुमार राकेश रूपवाणी (रा. छत्तीसगड) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक महादेव भानुदास यलमार यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी ऑनलाईन बेटींग, जुगार चालविण्यासाठी सोसायटीतील रहिवाशांना कोणतीही कल्पना न देता फ्लॅट भाड्याने घेतला. आरोपी चंद्रकुमार रूपवाणी याच्या सांगण्यावरून ऑनलाईन बेटींगसाठी ग्राहकांकडून पैसे घेतले. याची माहिती उपनिरीक्षक यलमार यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी पोलीस कारवाईसाठी गेल्यानंतर आरोपींनी फ्लॅटमध्ये पोलिसांना येण्यास मज्जाव केला. फिर्यादी यांनी आपण पोलीस असल्याचे सांगूनही त्यांना ढकलून देत सरकारी कामात अडथळा निर्माण केला. फ्लॅटमधून पोलिसांनी 3 लाख 60 हजार रूपये किंमतीचे 18 मोबाईल, सिमकार्ड, 60 हजार रूपयांचे दोन लॅपटॉप, दोन वायफाय राऊटर असा 4 लाख 22 हजारांचा ऐवज जप्त केला. हिंजवडी पोलीस तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *