Pune News : बिबवेवाडीमधील क्रीडापटू मुलीच्या हत्येचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा : उमा खापरे

Pune News : बिबवेवाडीमधील क्रीडापटू मुलीच्या हत्येचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा : उमा खापरे


Pckhabar-पुणे- बिबवेवाडीमधील क्रीडापटू मुलीच्या हत्येचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा, अशी मागणी भाजपा महिला मोर्चा प्रदेशाध्यक्षा उमा खापरे यांनी केली आहे.

याबाबत दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, महाविकास आघाडी सरकार थोडी तरी लाज बाळगा. आता तरी शक्ती कायद्याचा विचार करा.

दरम्यान, उमा खापरे यांनी बिबवेवाडी येथे जावून त्या मुलीच्या आई-वडिलांची व नातेवाईकांची भेट घेतली. तसेच, पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची भेट घेतली. आरोपींच्या विरोधात जबाब देणाऱ्या मुलींना सुरक्षा मिळायला हवी, अशी मागणी पोलीस आयुक्तांना करण्यात आली. तसेच, शहरातील मैदानांवर सुरक्षा व्यवस्था करता येईल का? याबाबत चर्चा करण्यात आली.

यावेळी भाजपा महिला मोर्चा पुणे शहराध्यक्ष अर्चना पाटील, सरचिटणीस आशा बिबवे, रेश्मा सय्यद, गायत्री भागवत आदी उपस्थित होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *