Sangvi News : नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने अनंतनगर महिला मंडळातर्फे गरबा, भोंडला, संगित खुर्ची यासह विविध कार्यक्रम

ही बातमी शेअर करा.

Sangvi News : नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने अनंतनगर महिला मंडळातर्फे गरबा, भोंडला, संगित खुर्ची यासह विविध कार्यक्रम


Pckhabar-नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने अनंतनगर महिला मंडळाच्या वतीने गरबा, भोंडला, संगित खुर्ची, ऑर्केस्ट्रा व नृत्य स्पर्धा अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होत या कार्यक्रमांचा आनंद घेतला.

अनंतनगर महिला मंडळाच्या वतीने दरवर्षी नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात व भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात येतो. यामध्ये महिला व मुला-मुलींच्या कलागुणांना वाव देण्यासाठी अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येतात. यावर्षीही हा उत्सव आनंदात साजरा झाला.

दरम्यान, माजी नगरसेवक व उद्योजक शंकर जगताप, माजी नगरसेविका वैशाली जवळकर, युवा नेते पिंटू जवळकर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष शाम जगताप, नगरसेवक सागर आंघोळकर, दिपक काशिद, रूपाली लांडगे आदी मान्यवरांच्या हस्ते नऊ दिवसांमध्ये देवीची आरती करण्यात आली. कार्यक्रमाचे संयोजन अनंतनगर तरुण मित्र मंडळातर्फे करण्यात आले.


ही बातमी शेअर करा.